Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

तू आणि मी वेगळा नाही ©️

तू आणि मी वेगळा नाही ©️

श्री समर्थ मालिक – यश हे अवश्य आहे, पण कधी कधी सत् सेवेकऱ्याला असताचे चटके बसतात. त्याला असताचे चटके बसून बसून यश हे आपोआप निर्माण होते. मात्र त्याला हे कळत नाही कि हे यश कशापासून मिळाले. हर्षयुक्त झाला की त्याला वाटते हे मीच करतो. पण यश आल्यानंतरच त्याची हर्षयुक्त भावना असते. पण जोपर्यंत कर्तव्य होत नाही, तोपर्यंत तो नाराजच असतो.

तीन तत्वें आहेत. त्यांतील दोन तत्वे अमर आहेत, पण त्यांतील एक नाशिवंत आहे. जडत्व हे पाच तत्वांचे आहे. त्यामुळे हे पाच तत्वात मिलन करायला लागते. अमर दोन पदे आहेत, ते अखंड तत्व अन ॐ कार बीज. ती दिसणार नाहीत. या दोन्हीचा नाश कोणी केला आहे का?

आता ॐ कार म्हणजे काय? कुठून आले? कोणी निर्मिती केली? तर अखंड तत्व, तेथून धूनधूनकार अन् त्यापासून ॐ कार निर्माण झाला. ओंकार म्हणजेच आकार ! आकार हा ओंकार स्वरूप झाला, मग प्रश्नच उरत नाही. मग तत्व समान झाले. प्रकृती आणि तत्व भिन्न आहे असे मानले, तर ॐ कार स्वरूप बनणे कठीण आहे. तत्व आणि प्रकृती एक झाली तर तू आणि मी वेगळा नाही. पण आताचा काळ मायावी आहे, म्हणून ॐ कार स्वरूप बनणे कठीण आहे. ©️

You cannot copy content of this page