Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

तू आणि मी वेगळा नाही २©️

तू आणि मी वेगळा नाही २©️

परब्रम्ह तत्व आपल्या ठायीच सर्वभूतेषु भरलेले आहे अन् भरून सुद्धा अलिप्त आहे. त्याचा शोध घ्यावयाचा आहे. पण ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय थांग लागणे कठीण आहे. आकाराला पुजल्याशिवाय निराकाराची ओळख होणार नाही. जे आकारी आहेत, त्यालाच ॐ कार स्वरूप हे नामाभिधान आहे.

याची वाढ कोणी करावयाची? मानवी तऱ्हेने त्रास झाला तर आसना जवळ सांगता, पण कृतीमान असेल तर सांगण्याची आवश्यकता होईल का? म्हणूनच जे अखंड आहे, त्याची निर्मिती नाही ते सापडत नाही, कोणी म्हणतात हवा आहे, कोणी म्हणतात गंध आहे, पण शक्ती किती आहे याची गणना कोणी केली नाही.

हवा म्हणजेच प्रणव ! हे ब्रह्म आकारी तसेच निराकारीही होऊ शकते. तो त्यांचा अधिकार आहे. पण सेवेकर्‍यांची पाहण्याची ताकद आहे का? जोपर्यंत सेवेकर्‍यांनी आसनाधिस्तांना ओळखले नाही, तोपर्यंत सेवेकरी असेच लुडबुड करणार ! आपण शुद्ध स्फटिकासारखे असल्यानंतर मग त्रास होईल का? हे सेवेकर्‍यांनी ओळखावे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page