श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – यद भावो । तद भवतू ।। जसा भाव तसा सदभाव, तशीच भावना, असद्भाव तशीच कुभावना. आपली क्रिया कर्मे मायातीत असल्यामुळे आपण फक्त सदभावनेचे अवडंबर करतो. सद्गुरूंना असे दर्शविण्याचा आम्ही सतत प्रयत्न करतो. आम्ही सद्गुरूंच्या ठिकाणी ठाम आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न करतो. आपले सद्गुरु आपल्याला सांगतात, संसारात राहून संसाराची पूर्णत्व कर्तव्यें कर. मुला माणसात आनंदाने रहा. समर्थ तुला सदैव देणारे आहेत. कोणतीही काळजी करू नकोस. पण एक लक्षात ठेव ही सर्वस्व माया आहे. ती नाशिवंत आहे. इतकेच काय तू जे कवच धारण केलेले आहेस ते देखील नाशिवंत आहे. परंतु तुझ्या आत वास करणारे जे अविनाशी आहेत, ते मात्र लय होणारे नाही. मग तू हा का विचार करत नाहीस, का यामुळे स्वतःला मायेत गुरुफटवून घेतोस?
काही काही मानव असे विपरीत वागत असतात आणि विचार करतात की मी जे काही करतो आहे ते कोणाला कळणार आहे? परंतु तुमच्यात जे सत आहे, जे अविनाशी आहे, त्याला मात्र पूर्णत्व जाण असते. अरे! जे अनंत, अविनाशी सत आहे त्यांचे लक्ष सूक्ष्म होऊनही सूक्ष्म असलेल्यावर असते, तर तुमच्यावर त्यांचे लक्ष असणार नाही का? अरे अनंत तत्व कसे आहे तर सर्व व्यापून अलिप्त तत्व आहे. सर्व ठिकाणी विखरून देखील अलिप्त आहे. मग असे हे जे विखुरलेले तत्त्व आहे त्यांच्या नजरेतून काही सुटणार आहे का? अरे सेवेकऱ्यांनो! तुमच्या आमच्यात सर्वस्व एकच तत्व भरून उरले आहे, फक्त आमच्या प्रकृतीत फरक आहे. मग आता तुम्हीच सांगा जे आतमध्ये वास करीत आहे ते तुमची कृती, क्रिया, कर्म जाणते की नाही? हे मानवा, हे सर्वस्व तू गुप्त ठेवतोस, हे मना तू हे कळू देत नाहीस. सेवेकर्यांनो तुमच्यावर प्रसंग आल्यानंतर मग सेवेकरी आसनाजवळ गयावया करू लागतो आणि सांगतो,” बाबा यातून केवळ आपणच मला सोडवू शकाल”….©️
