Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

मी तू रहित व्हा…©️

मी तू रहित व्हा…©️

श्री समर्थ मालिक – मी नाही असा रिकामा ठाव नाही. संतांनी वर्णन केलेले आहे की, भगवंता शिवाय वृक्षाचे पानही हलत नाही. पवन सुटत नाही. पर्जन्य पडत नाही. सर्वस्व माझ्या सत्तेने होते. असे जर आहे, तर सेवेकर्‍यांनी आपल्या हृदयात याची खूणगाठ का बांधू नये? मी तू रहित का होऊ नये? मी तू रहित झाल्यानंतर सर्वांचे मन एकत्र होईल की नाही?

प्रकृतीच्या अंगाने सेवेकरी पाहतो. तो लहान, तो मोठा ! पण यात लहान आणि मोठे काही नाही. हे ज्याच्या त्याच्या कर्मसंचिताप्रमाणे असते. काहींना वाटत असते, मी निराळा आहे. पण सर्व घरी जर मी आहे तर निराळा कशावरून? म्हणूनच आपल्या सेवेकर्‍यांनी मी कोणाचा सेवेकरी आहे हे ओळखावे.

सर्व सेवेकरी एकाच तत्त्वाचे आहेत. ते माझे कोण आहेत? माझे जन्मदाते सर्व ठिकाणी विखुरले आहेत, याची गती सर्व सेवेकऱ्यांना सापडली असेलच. असे जर आहे, तर त्या ठिकाणी शांत कृतीने मनाला आळा का घालू शकत नाहीत? तरंग का दूर करू शकत नाहीत? तर हा विसरभोळेपणा नाही का?

बोलताना सेवेकरी बोलतो असे वाटते. अन् यावर चर्चा चालते. एकाने एकपट बोलले, तर दुसरा दसपट बोलतो. काही सेवेकरी अहंकारी आहेत. पण तो अहंकार शुद्ध सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करा. सेवेकऱ्यांने असे म्हटले पाहिजे, मी तुझा आहे, तू माझा आहे. आपला जन्मदाता एकच आहे. याप्रमाणे चला म्हणजे वाद निर्माण होणार नाहीत. याप्रमाणे वाटचाल करा. मग शांती सुखाचा मार्ग लवकर सापडेल. मोक्षाची वाट अलीकडे येईल. मग माया इकडे तिकडे हलू शकणार नाही. पण हे केव्हा अन् कधी होईल, तर सद्गुरु नामात तल्लीन होण्याचा प्रयत्न केला तर होईल. ©️

You cannot copy content of this page