Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

कैवल्यपंथ…©️

कैवल्यपंथ…©️

श्री समर्थ मालिक – सद्गुरु या विषयावर अनेक प्रवचने झाली आहेत. सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असे जर आहे तर भिक्षा मागायला लागेल का? लाघव होईल का? तुझे माझे निर्माण होईल का? म्हणून आपण कैवल्य पंथाचे प्रवचन सुरू केले होते. मग सेवेकर्‍यांनी या पंथाचा अंत घेतला आहे का?

कैवल्य पंथ म्हणजे क्षणोक्षणी कला दाखविणारे, कलेकलेने खेळ करणारे, धारणा करणारे, वर्तणूक वाढविणारे, कलेकलेने आता एक अन् क्षणात एक. आज एक तर उद्या दुसरे. भक्ताला दु:खी करणारे तेच अन् सुखी करणारे ही तेच. हाच कैवल्याचा पंथ आहे. याचा अंत घेण्याचा प्रयत्न करा.

मोह हा जर सद्गुरुं पेक्षा तुच्छ आहे असे मानले, तर सेवेकरी कधी फसणार नाही. सेवेकर्‍यांनी मोहात गुंतावे पण तो मोह शुद्ध सात्विक पाहिजे. मोह हा सताचा हवा, सताप्रती हवा. कारण संसार हाच मुळी त्रिगुणी आहे. त्रिगुणी ही माया आहे. माया ही सद्गुरुं पेक्षा वेगळी आहे. सद्गुरु सत् आहेत. अतिशयोक्ती करू नये. घर्षण झाल्याशिवाय चमत्कार होणार नाहीत. घर्षण झाल्याशिवाय निवड होणार नाही. घर्षण हे सेवेकरी सोडून होणार आहे. ©️

You cannot copy content of this page