Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

भक्ती करतो, ती कशासाठी? ©️

भक्ती करतो, ती कशासाठी? ©️

श्री समर्थ मालिक – जी भक्ती आपण करतो, ती कशासाठी? तर जो मानव करील त्याच्याचसाठी ती आहे, अन् ती भक्ती त्याच्याच बरोबर असते. दोन्ही उभयता जरी असलात तरी नवऱ्याने केली ती बायकोला नाही, अन् बायकोने केली ती नवऱ्याला नाही.

आता सांगा, या दरबारात एकाच घरात एकाच कुटुंबात किती सेवेकरी आहेत? त्यांचीच वळणे पहा. संतांच्या वचनाप्रमाणे चालले आहेत का ते सारे? आता तुम्ही तसेच घडविले तर संतांप्रमाणे केले जाते.

या दरबारात, काही एका तपाच्या, काही दोन तपाच्या ज्योती आहेत. काही अनेक तपांच्या होऊन गेल्या आहेत, त्या जर अशा करू लागल्या तर नवीन ज्योतींना कसे वळण द्याल? म्हणून मनाला वळण देण्यासाठी शुद्धीकरण करावे लागते.

काही ज्योतींना अनुभव दिलेला आहे. काहीना द्यावयाचा आहे. येणारा काळ निराळा आहे. दरबारात येणारेच भक्त नाहीत. अनेक भक्त बाहेरही विखुरले आहेत. ते मानव शुद्ध करण्याचा आराखडा चालला आहे. त्या आराखड्यातून एक म्हणा, दोन म्हणा तपाच्या ज्योतीनी सुधारावे हे संदेश आहेत. जे आलेले नाहीत, त्यांनाही हे सांगा.

तुम्ही जर मला म्हटले हे असे कसे? ती ज्योत सुद्धा निवडली जाईल. ज्याचा संसार बरोबर नाही तो सत कसला? सेवेकरी कसला? कोणाच्या पुण्याईने हे घडले? ती ज्योत भाग्यवान असेल, पुण्यवान असेल तर ती किती जणांचे कुटुंब चालवते. मायेचे पलिकडे कसे ठेवायचे, कसे पाठवायचे हे कोणाला माहित आहे? ©️

You cannot copy content of this page