Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

यश कोणाचे आधीन असते…©️

यश कोणाचे आधीन असते…©️

श्री समर्थ मालिक – “सगुनाचा सार घेणे यातच सर्वस्व आहे.”

संसारात राहूनच कोणाचे कृपेने हे चालले आहे, कुणाच्या कृपेने हे करतो आहे, हे ज्याला समजले, ज्याने जाणले तो कुठेही भिक्षा मागावयास जाणार नाही, पण अशी कृती होणे कठीण आहे. हे सर्वस्व समर्थांचे आहे, त्यांच्याच कृपेने मी कर्तव्य परायण आहे, कर्तव्य करतो आहे, अशी ज्याची ठेवण असते, त्यांच्याच ठिकाणी मग यश त्याचे आधीन असते. मग एकाच्या सख्यत्वासाठी प्राण अर्पण केला की न केला, हे सेवेकऱ्यांने ओळखावे.

असे ते तत्व कोणते आहे? एकाच्या सख्यत्वासाठी मी काही नाही केले, पण त्यांच्यात भक्ती असून, तो मायावीत असला तरी तो माझा आहे. पण शेवटी तो काय घेऊन जातो? अन् कोणाचे कोणाला वाहतो? हे त्याला कळत नाही. याचा निर्माता कोण? प्रेम निर्माण कोण करतो? भाव निर्माण करणारे, चेतना निर्माण करणारे अशी काही तत्वे आहेत. पण ठाम निश्चय करणारा तरी कोण? मनाची चलबिचल करणारा कोण? म्हणून एकाच ठिकाणी तरी ठेवणारा कोण?

सर्वस्वी संपत्ती जरी मला अर्पण केली, तरी मला संपत्तीचे काय करावयाचे? मी तर निष्कामच आहे. मला संपत्तीची आवश्यकता काय? इतके समजावे, आम्ही जे करतो, धरतो, संपत्ती जमवितो ते कोणाचे सत्तेने करतो? हे त्याने समजावे व त्याप्रमाणे वाटचाल करावी. आणखी काय सांगावे? यात रामदासांचे काय चुकले? त्यांनी काव्यरचना केली ती बरोबर आहे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page