Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

मन कुठूनही आले नाही…©️

मन कुठूनही आले नाही…©️

श्री समर्थ मालिक – मन कुठूनही आले नाही, मन हे माझ्यापासून आहे असे म्हटलेले आहे. मन म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण केलेले आहे. मनाचे आणि तत्त्वाचे बोलणे चालणे ओळखा. म्हणून सेवेकऱ्याने अशा तऱ्हेने वाटचाल करणे. मनाने जरी कोलांट्या उड्या घेतल्या, तरी देह सद्गुरु चरणांजवळ घालणे.

गुरु शिष्याचे प्रेमयुक्त भाषण पाहून मलाही आनंद होत आहे. कारण आज कालचे हे प्रेम नाही. परंपरागत ही जोडी आहे. पण इतकेच, ज्याला ही गती मिळाली त्यालाच ते मिळते. भिन्न प्रकृती अनेक तऱ्हेने वाटचाल करते. अनेक तऱ्हेने बोलते. सत् मार्गाने जाणाऱ्या मानवांनी त्याकडे दुर्लक्ष करणे. सतयुक्त भावनेने सेवेकरी असतील तर सद्गुरु निराकरण करतील.

पंचामृताचे भांडे स्वयं आहे. ज्याला आंबट खाण्याची सवय असते त्यालाच ते मिळते. ही कर्म संचिताप्रमाणे ठेव असते. त्याप्रमाणे प्रकृती ठेवणे भाग असते. पण जो सतभक्त असतो, तो जरी भुकेलेला असला, तरी एक वेळ तरी त्याला पोटभर अन्न द्यावे लागते.

प्रकृतीचे मूळ आधार आहेत. प्रकृतीच्या अंगाने जो जातो, त्याला त्याच तऱ्हेची गती मिळते. सत गतीने जो गेला, तो उत्तम पदाला पावला. ©️

You cannot copy content of this page