श्री समर्थ मालिक – सेवेकर्यांची कल्पना चांगली आहे, स्थूलावर कर्तव्य व्हावे. वेळ आल्यानंतर कर्तव्य करा सांगण्याची आवश्यकता नसते. वेळ आल्यानंतर कर्तव्यास अवधी लागत नाही. बारा वर्षाचा काळ सहज निघून गेला. पण पूर्वीच्या काळा इतकी सहनशीलता झेपत नाही व सोसत नाही. या उ:शापाच्या काळामध्ये काय होईल व कशी मानवाची बुद्धी फिरेल सांगू शकत नाही. जशी मानवांची बुद्धी, तशी मनाची भावना कळते. पळण्यास मोकळीक! थोडा काळ पुढे ढकलला आहे. कोणीही वाईट वाटून घ्यायचे नाही, नाराज व्हावयाचे नाही. पहिल्या पासूनची ती भावना आहे. त्रास झालेला आहे, होत आहे. अवधी बाबत वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही. का अवधी लागतो आहे, सर्वस्वाची गती आहे. सर्वस्वाचे स्पष्टीकरण करावे कसे?
सत हे केसापेक्षाही अगदी मृदू आहे, लोण्यापेक्षा मृदू आहे. सताची मृदुता केव्हा काय करते याची कल्पना मानवाला नाही. अन ज्या ज्या वेळी अवतार कार्य घेतले त्याची कल्पना चांगल्या तऱ्हेने आहे. अवतार कार्यामध्ये युद्ध करावे लागले होते. मानवी तऱ्हेने कष्ट काढलेले आहेत. भक्तगणांनी प्रमाणाबाहेर त्रास सहन केला. काही कारणास्तव, आजचे उद्या केलेले नाही. कर्तव्य होणार हे निश्चित! ते सांगून होणार असे नाही. अघोर कसे असते, खाऊन पिऊन सुखी असते, चोर सुळसुळीत असतो. चोर व अघोर सुळसुळीत असतात. भक्तीचे तेज नाही व तो फुगलेला असतो. केव्हा वेळ आली म्हणजे फुटून जातो. ©️
