Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

नामाचा उजाळा केल्यानंतर…©️

नामाचा उजाळा केल्यानंतर…©️

श्री समर्थ मालिक – प्रणव निर्माण कसा होतो? कोठे जातो आणि कोठे लय होतो? प्रणव जो आहे तो अखंड आहे. अखंड अखंडात विलीन होते. प्रणव आकारी पण आहे आणि निराकारी पण आहे. प्रणव जर बंद पडला तर बाकी काय चालते का? तर नाही. मी जो आहे तो नामातच आहे. क्षरातही आहे, अक्षरातही आहे. चरात पण आहे अन् परात पण आहे. मग आणखी काय पाहिजे? मग प्रणव कोठे जातो? कळत नाही.

बोल बोलातून निघत असतो. चैतन्य निर्माण चैतन्यापासून होते. वेदना झाल्या की बोल बाहेर पडायला सुरुवात होते. चंचलता वाढली की बोल बाहेर पडतात. दाबून ठेवले तरी किती दिवस ठेवणार? इतकेच आहे की, सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म प्रणव ती म्हणजे हवा.

येथे सर्वच सेवेकरी आहेत असे काही नाही. तत्वाला बांधून घ्यावयाचे ते भक्तीने बांधून घ्यावयाचे असते. भक्तीने बांधून घेतले तर आपोआपच गती मिळते. विचारण्याची सुद्धा गरज नाही.

भक्ती ही सोपी तितकीच कठीण देखील आहे. सेवेकरी म्हणा अगर मानव म्हणा टिचभर पोटासाठी अनेक व्याप करतात. त्यातूनच हे सर्व चाललेले आहे. सेवेकऱ्यांची मनें स्थिर आहेत का? भगवंताला‌ बांधावयाचे असल्यास भक्तीने बांधा. मग सत कोठून प्रगट होते आणि कोठे जाते अन् कोठे लय होते हे समजेल. पण यातूनही जे वेगळे आहे ते सापडणे कठीण आहे. त्यातच लय झाल्यानंतर सांगण्याची आवश्यकता नाही. विचारण्याची ही आवश्यकता नाही. लय झाल्यानंतर सांगता येणार नाही, आहे हे सतच आहे. नामाचा उजाळा केल्यानंतर ज्ञानात आपोआप भर पडते. ज्ञान म्हणजे प्रकाश. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page