Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

सुधारणा झाली पाहिजे, कुधारणा सोडली पाहिजे ©️

सुधारणा झाली पाहिजे, कुधारणा सोडली पाहिजे ©️

खरे आहे ! मन मोठे चमत्कारीक आहे. मनाच्या ठिकाणी एक दृष्टी. त्यानंतर म्हणतो, मालिक, तुम्हीच सर्वस्व करा. त्याचा तो कुटुंबासहित सुखी असतो. नोकरी तब्येत याबाबत नेहमी तक्रारी असतात.

योगी, पूर्वीचे मानव हे मनाने ठाम होते. आपण ठाम असता कां? – कधी, केव्हा? जो मनाने ठाम, तोच सतात रममाण होतो. नंतर त्याला दरबार समजू लागतो. प्रत्येक सेवेकरी शुद्ध, शांत, सरळ व्हावयास पाहिजे, परंतु तो होत नाही. कुठला सेवेकरी झाला आहे कां?

मी जास्त किंवा कमी केले असे सेवेकरी समजतात, परंतु कर्तव्य करून घेणारे निराळे असतात. मी केले असे म्हणू नये. हे जर समजले तर मी दूर नाही. आदीअंता पासून सद्गुरू, योगी होऊन गेले व सतात रममाण झाले.

जे मायेमध्ये रममाण झाले, त्यांच्यावर मायेचा कब्जा असतो. आसनाधिस्त सांगतात, त्याप्रमाणे शुद्ध, सरळ मार्गी ज्योती होण्याचा प्रयत्न करा. त्याप्रमाणे अभ्यास करावा.

योगी होऊन गेले. तत्त्व, नाम, जप हे सर्व निराळे नाही. स्थूल प्रत्यक्ष कर्तव्य करीत असते. अदृश्याच्या कर्तव्याचा अंतपार नाही.

सेवेकर्‍यांनी स्थिर ठाम का होऊ नये? जोपर्यंत स्थुल आहे, तोपर्यंत गतिमान व्हा ! नंतर मी जाणतो काय करावयाचे? गतिमान व्हा ! सर्वस्व करून घेतले जाईल. त्याप्रमाणे करूनही घेतात. आपल्या संचितात असत भर घालू नका. संचिता मध्ये हेवा दावा घडवू नये असे संदेश आहेत. प्रत्येकामध्ये सुधारणा झाली पाहिजे. कर्तव्यात रहा, मग ते जवळच आहेत. एक वेळ चुकेल त्या चुकीस क्षमा आहे. परंतु परत परत क्षमा करावी का? क्षमा मागण्यास ना अंत ना पार. आपणच सुधारल्यानंतर क्षमा मागण्याची काय आवश्यकता असते? जाणून बुजून चुकावयाचे नाही. सानिध्यात असताना अभ्यास करावा. मग क्षमा मागण्याची आवश्यकता नाही. चुकू लागल्यानंतर मग क्षमेला अर्थ नाही. (समाप्त)©️

You cannot copy content of this page