Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

अविद्येचे मूळ – ©️

अविद्येचे मूळ – ©️

श्री समर्थ मालिक – अविद्येचे मूळ पर ते उपडोनी सांडू | आशा मनीषा कृष्णा काम क्रोध कुरवंडू || ज्याने अविद्येचे मूळ उखडले,‌ आशा, मनीषा, तृष्णा, काम, क्रोध यांची कुरवंडी केली, त्यांनीच हे म्हटलेले आहे. तेव्हा ते लिखाण पाहून सेवेकरी तसे प्रयत्न करीत आहेत का? अविद्येला, मूळ मायेला उपटून टाकण्याचा प्रयत्न होईल का? जोपर्यंत सेवेकर्‍याच्या अंत:र्यामी समतेचा पाझर फुटत नाही, तोपर्यंत मूळ उपटणे कठीण आहे.

महामायेचे मूळ उपटून टाकण्यासाठी कृती करावयास पाहिजे. वर्तणूक कशी पाहिजे? तिचे मूळ उपटून टाकले तरच, समर्थ पाठीमागे उभे राहतात. याप्रमाणे सेवेकर्‍यांची कृती असेल तर अविद्येचे मूळ उपटू शकता. आशा, तृष्णा याची कुरवंडी करू शकता. सेवेकरी ध्यानात बसला तर मन कुठे कुठे जाते? परत त्याला जागा करून ठिकाणावर आणावे लागते. मग असा सेवेकरी अविद्येचे मूळ उपटून टाकू शकतो का?

प्रत्येक सेवेकऱ्याने, मग तो कोणीही असो, आपले कोठे चुकते हे प्रथम शोधावे. आपणा ते नमावे | काम क्रोधास दंडावे | मदमस्तर खंडावे | तरीच पावावे माझे पद || असे झाले आहे का? कोणत्या सेवेकऱ्याचे असे झाले आहे? अन् अशा तऱ्हेने सेवेकरी वाटचाल करतील तर मग मात्र अविद्येचे मूळ उपटून टाकू शकतो. सेवेकऱ्यांच्या ठिकाणी अविद्येचे मूळ उपटण्याचे, काम, क्रोधाची कुरवंडी करण्याचे सामर्थ्य नाही. पण त्याची जर पात्रता असेल तर त्याच्यासाठी समर्थच अविद्येचे मूळ उपटून टाकतात. सद्गुरु मूळ उपटून टाकू शकतात. पण केव्हा? अन् कधी? म्हणून आपण त्या पात्रतेचे झाले पाहिजे. तेवढे आपण कमाविले पाहिजे. याच जन्मी सेवेकरी अविद्येचे मूळ उपटून टाकू शकेल असे नाही. ©️

You cannot copy content of this page