Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

चैतन्य ! सर्व ठिकाणी भरून उरलेले, परात आहे त्याच्याही पलीकडे आहे. चरातही आहे आणि परातही आहे. सर्व ठिकाणी आहे. पाहणाऱ्याला पाहता येते, …

तर निर्विकारापासून निर्मिती ! प्रथम चैतन्य निर्विकार, तेथून धुनधुनकार, येथून ओंकार म्हणजेच आकार निर्माण झाला. आकार निर्माण करावा लागला. आकार निर्माण केला …

संतांनी स्वतःचा अनुभव सांगितला. जो भक्तित रममाण झाला, त्याला लबाड, दुश्मन, चांडाळ दिसत नाही. पापपुण्य समजत नाही. तो एकातच रममाण झालेला असतो. …

इंद्रियांना वळण कसे आणि कोणत्या रितीचे आणि कोणत्या नाही हा प्रश्न आहे. जी ज्योत भक्तित, सद्गुरु चरणात लिन झाली असेल, त्यांच्या इंद्रियाचे …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

इंद्रियांना वळण ©️

इंद्रियांना वळण ©️

इंद्रियांना वळण कसे आणि कोणत्या रितीचे आणि कोणत्या नाही हा प्रश्न आहे. जी ज्योत भक्तित, सद्गुरु चरणात लिन झाली असेल, त्यांच्या इंद्रियाचे वळण कसे असते म्हणून त्यांनी सांगितले? पडीले वळण इंद्रिया सकळा ! त्याला जिकडे पहावे तिकडे सतच सत् विखुरलेले दिसत होते. त्यांची इंद्रियें सद्गुरुमय झालेली होती. त्याचा भाव निराळा नाही. त्या संताने असे म्हटले त्याप्रमाणे खरे होते की नाही? त्याचे रोम रोम सर्वस्व सतमय झाले होते. या पृथ्वीतलावर प्रकृती किती आहेत? व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. पण प्रकृती अभिन्न होईल तर एकच वळण लागेल. तुकोबाच्या म्हणण्याप्रमाणे मग सोपे आहे की नाही?

प्रकृतीच्या वळणाप्रमाणे हरएक मानव जातो. प्रत्येकाचे वळण निरनिराळे असते. जो असत मार्गी जातो, त्याच्या इंद्रियांना असत वळण लागते. जशी ज्याची मनोभावना, तशी गती मिळते. जो खरोखर यात रममाण झाला, त्याच्यात आणि असत भक्तिच्या मानवात जमीन अस्मानाचा फरक असतो. सत भक्तीने जाणारा माझ्या प्रत येतो आणि असत भक्तीने जाणारा माझ्या प्रत येत नाही, म्हणून असत भक्तिने जाणारा कदापिही माझ्याजवळ येणार नाही.©️

You cannot copy content of this page