सेवेकऱ्यांची भावना उच्च दर्जाची आहे हे मी जाणतो. पण कोणतेही कर्तव्य योगायोगाने होते. संचिताप्रमाणे कोणतीही वस्तू मिळते. भावना असते, मी एकदम, सद्गुरु सानिध्याने आणखीन विवेचन करीन. काहीतरी चमत्कार दाखवीन असे सुद्धा वाटते. सत् कर्तव्य परायनतेणे जे कष्ट केलेले असतात, त्या सत् कर्तव्याचे फळ सेवेकऱ्याला अवश्य मिळते. पण केव्हा आणि कधी? हा प्रश्न आहे. पण तेच इच्छा रहित, आशा रहित, स्वार्थ रहित झाले म्हणजे आपोआपच होत असते. ते त्याला संचिताप्रमाणे मिळते.
सेवेकऱ्याने म्हटले पाहिजे माझे कर्तव्य मला प्रथम पाहिले पाहिजे. मी कोणीही नाही. मी एक त्यांच्या चरणाचा कण आहे. पूर्वीच्या संतांची गंभीरता आणि शांती पाहून मला त्यांच्या गुणांचे वर्णन करता येत नाही. त्यांच्या कष्टामुळे अखंड चमत्कार दाखवावे लागले.
आताच्या सेवेकऱ्याचे मात्र कष्ट कमी आणि फळ तंतोतंत मागावयाचे. पाच मिनिटे नामस्मरण करीत बसला तर मी पाहतोच आहे. किती नामस्मरण होते? कुठे फिरतो. थोडीशी मायेला टिचकी दिली की मग पाहतोच आहे आणि म्हणूनच या दरबारात आसनाजवळ जे चमत्कार ते इतर ठिकाणी नाहीत. इतर ठिकाणी दिसणार नाहीत. घडणार नाहीत.
मायावी चमत्कार इतर ठिकाणी मिळतील, पण अखंड चमत्कार इतर ठिकाणी मिळणार नाहीत. म्हणून प्रार्थना म्हणजेच परात्पर, क्षरात्क्षर, चराचर असे असणारे, अर्थात अनर्थातही असणारे व याच्याही पलीकडे उरलेले असे महान तत्व आहे. याची गती ज्या सेवेकऱ्याने घेतली त्याने हे म्हटले आहे,
माझी सेवेकर्याची प्रार्थना आहे, प्रार्थना करतो आहे, असे की ज्याचा अंत नाही, पाहिले तर सांगता येत नाही, धरता येत नाही, कवटाळता येत नाही, कडकडून भेटता येत नाही. सेवेकऱ्याच्या मनाची समजूत करण्यासाठी रूप धारण केले तरच भेटता येईल. निरंकारी असल्यानंतर भेटता येईल का? आकारी निराकारी कोठे आहे? याचा सेवेकर्यांनी विचार करून, कोणत्या रस्त्याने कशी वाटचाल करता येईल याचा विचार करणे. (समाप्त)©️
