Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

सेवेकरी विष्णू कदम (निवेदन) – ©️

सेवेकरी विष्णू कदम (निवेदन) – ©️

दिनांक: २० जुलै १९७२ सेवेकरी विष्णू कदम – अचानक झालेल्या घटनेमुळे फारच वाईट वाटते. स्थूलात राहण्याची इच्छा होती, पण समर्थ इच्छेने जे काय होईल ते फार चांगले असते. सेवेकर्‍यांनी इच्छा दर्शविली की तो मायावी गतीने जातो. समर्थ इच्छेने जे होते ते हितकारक असते. म्हणून मी इच्छा काय आहे ते सांगत नाही. सानिध्यात असताना ही गती नव्हती. पण आता पूर्णत्वाने गती मिळत आहे.

अपघात झाला त्या ठिकाणाहून येथे कसे आणले हे सांगता येत नाही. आज संदेश मिळाले, हा भाग्याचा दिवस आहे. आज पुन:रपी दर्शन मिळाले. आता समर्थ इच्छा ती माझी इच्छा. समर्थ आदेश पाळणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. आपले आदेश काय आहेत त्याप्रमाणे वाटचाल करणे हे कर्तव्य आहे.

समर्थ एकच शक्ती आहे. त्यांच्याच इच्छेप्रमाणे सर्वस्व चालते. गुरुबंधूत्वाचे नाते पवित्र अन् श्रेष्ठ आहे. आत्ता प्रकाश मिळाला आहे. स्थूलात असताना शंका, कुशंका विचारल्या. गुन्ह्याला मी पात्र आहे. कारण शास्त्रांचे लिखाण आणि समर्थ बोल यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. शास्त्राधाराने शंका निर्माण झाली, त्यामुळे विचारले, ही माझी चूक झाली.

वेद मौनावले हे आत्ता समजून आले. शास्त्रांचे लिखाण व सताचे बोल यात फरक आहे. शास्त्रालाही त्यांचा अंत नाही, त्या आधाराने बोललो हे चूक आहे. शंका दर्शविल्याबद्दल क्षमा असावी. मानव जन्म हाच पवित्र अन् श्रेष्ठ आहे. हा जन्म फिरून मिळणे दुरापास्त आहे. मानव त्या पात्रतेचा असेल, सताची चाकोरी सुटली नसेल, तर सत् त्याला अनवाणी टाकणार नाही. यासाठी सेवेकऱ्याने काय करावयास पाहिजे? याची खूणगाठ त्यानेच बांधावी. त्याप्रमाणे वाटचाल करावी. आणखी काय सांगू? (समाप्त)©️

You cannot copy content of this page