Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

मन शुद्ध ठेवणे ©️

मन शुद्ध ठेवणे ©️

श्री सद्गुरु बाबा – मानवी मनाची वृत्ती निर्भीड असेल तर तोच मानव मनावर ताबा ठेवू शकतो. वृत्ती ही त्रिकुटीच्या आधीन आहे. वृत्ती शुद्ध असेल तर कानाने ही शुद्ध ऐकाल. वृत्ती हीन असेल त्या ठिकाणी कधीही शुद्ध विचार येणार नाहीत. वृत्तीच्या ठेवणीने पडदा फाकला जातो.

“सूक्ष्म ज्योतीला सोडून नाही. मन सूक्ष्माला सोडून नाही.”

मनाला शुद्ध ठेवायचे असेल तर प्रथम पायरी वृत्ती शुद्ध ठेवली पाहिजे. वृत्ती शुद्ध असेल तरच त्रिकुटी स्थिर राहील. कितीही उच्च पदाची ज्योत असली, पण जर त्याची वृत्ती हीन असेल तर त्याच्याकडून काहीही होणार नाही. ज्याची वृत्ती सत शुद्ध आहे, त्याला जगात कोणीही बनविणार नाही. वृत्ती जर शुद्ध नसेल तर मन केव्हाही स्थिर राहणार नाही. मन स्थिर राहिले नाही, तर कधीही सद्गुरू प्राप्त होणार नाहीत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page