Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

पूजा – ©️

पूजा – ©️

श्री गुरुपौर्णिमा – आज या शुभदिनी केलेली वेडीवाकडी पूजा चरणांवर रुजू आहे. कारण सेवेकरी अडाणी, अडबंग असतो, पण त्याने स्वयंस्फूर्तीने केलेली पूजा चरणांवर रुजू करून घ्यावी लागते.

पूजा कशी करावी ? कोणत्या तऱ्हेने करावी? याचा सेवेकऱ्यांना गंध नाही, पण अल्प बुद्धीने, स्वयंपूर्तीने केलेली पूजा सेवा रूजू आहे. जसजसे संदेश मिळतील त्या त्याप्रमाणे सेवेकऱ्याने पूजा करणे. हे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे. पूजा ही षोड्शोपचारे करणे. मात्र सेवेकऱ्याने सत् शुद्ध भावनेने, आत्मीयतेने केलेली पूजा चरणांवर घ्यावी लागते.

सत् पद महान आहे. मानवी सेवेकरी गृहस्थाश्रमी आहेत. मायावीत गुरफटलेले आहेत. माया ही सत पण आहे आणि असत पण आहे. सत मायेने गेल्यानंतर सत पदाला जातो. सत मायेने वाटचाल केल्यानंतर अंत:र्यामीने प्रेरणा दिली की तो पाहतो. हे साधल्यावर तन मन धन ही तिन्ही अंगे अर्पण करावी लागतात. तुमच्या भक्ती प्रमाणे जे रुजू करावयाचे, तोच हा महान दिवस आहे. ज्यांना साधले, सापडले, कळले ते महान सेवेकरी धन्य होत. आजचे गुरुपद महान श्रेष्ठ पदाचे आहे.

अनंत अवतार झाले. कार्याची सिद्धता साधली, पण आजचा हा दिवस न्यायदानाचा आहे. न्याय हक्काचा आहे. हे आसन न्यायदानाचे, सतपदाचे आसन आहे. हा दिवस फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी सेवेकरी फार जपत असतात. या शुभदिनी सद्गुरु मुखातून जे बोल निघतात, ते झेलण्यासाठी सेवेकरी धावत असतात, पण अखंड न्यायदानाचे आसन आणि त्या न्यायदानाच्या आसनावरच्या न्यायाला फार महत्त्व आहे. यावरूनच पुढच्या आढाव्याची गती घ्यावयाची असते. सर्वस्व गतीचा आराखडा याच शुभदिनी तयार करण्यात येतो. वाल्मिकीने रामायण याच शुभदिनी रचिले. महाभारत सुद्धा याच शुभदिनी रचले म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजच्या या शुभदिनी जे महान बोल मिळाले, ते जतन करून ठेवणे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे. याचाच अर्थ सेवेकरी आणि सेवा होय. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page