Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

अनासक्ती-२-©️

अनासक्ती-२-©️

सेवेकऱ्याने अंत:र्दृष्टीने पाहिल्यानंतर जी पाच तत्वे आहेत, ती निराकारी आहेत हे कळू लागते, मग ही पाच तत्वे आहेत, ती आकारी कशी केली? आणि कशासाठी केली? या पाच तत्वांचा एक आकार जमवून, त्या आकाराच्या आत निराकार बसले आहेत आणि आतल्या आत चुपचाप पाहत असतात. आकारी पिंजरा निराकारी केव्हा होतो? तेच सद्गुरु अविनाशी तत्व बाहेर पडल्यानंतर, आकारी पिंजरा निराकारी होऊ शकतो. पाच तत्वे पाच तत्वात मिलन झाल्यानंतर निराकारी होतात.

सेवेकरी जोपर्यंत सद्गुरु चरणात लीन नाही, सद्गुरु चरणांचा ठाव घेतला नाही, तोपर्यंत त्याला हे कसे कळावे, ते कसे करावे, कोणत्या बाजूने जावे, अशी सेवेकऱ्याची मनोभावना होते. सद्गुरूंचा अंत कसा मिळेल? सद्गुरु अहर्निश सानिध्यात असावेत. क्षणोक्षणी त्यांचे दर्शन कसे होईल, अशी सेवेकऱ्यांच्या मनाची उद्विग्नता होते, पण असे होण्याकरता सेवेकऱ्याने काय करावे याचा विचार नको का करावयाला?

पूर्वीच्या महान संतांनी सांगितले ते सद्गुरु चरणात लीन असल्याशिवाय सांगितले का? असे आताचे सेवेकरी होतील का? त्यांनी प्रत्यक्षात अनुभवावे, सद्गुरु चरणात गुंग व्हावे. ज्यांनी सद्गुरू चरणांचा ठाव घेतला, प्रत्यक्षात अनुभवले ते श्रेष्ठच आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी लिखाण करून ठेवले. संतांनी लिखाण केले, कष्ट केले ते सद्गुरु कृपेने केले. तसाच आताच्या सेवेकर्‍यांनी देह झिजवावा, मग सद्गुरु वळण का देणार नाहीत? त्यांच्याकडून का करुन घेणार नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या सेवेकऱ्यांनी लिखाण करून ठेवावे ही इच्छा आहे. अशा तऱ्हेने सेवेकरी राहिल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची न्यूनता भासणार नाही. (समाप्त)©️

You cannot copy content of this page