Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

पडिले वळण इंद्रिया सकळा | ©️

पडिले वळण इंद्रिया सकळा | ©️

श्री समर्थ मालिक – पडिले वळण इंद्रिया सकळा | भाव तो निराळा नाही दूजा | इंद्रियाना वळण कसे आणि कोणत्या रितीचे असावे आणि कोणत्या रितीचे नाही हा प्रश्न आहे.

जी ज्योत भक्तीत, सद्गुरु चरणात लिन झाली असेल, त्यांच्या इंद्रियांचे वळण कसे असते म्हणून त्यांनी सांगितले आहे?

“पडिले वळण इंद्रिया सकळा” त्याला जिकडे पहावे तिकडे सतच सत् विखुरलेले दिसत होते. त्यांची इंद्रिये सद्गुरुमय झालेली होती. त्यांचा भाव निराळा नाही. त्या संताने असे म्हटले, त्याप्रमाणे खरे होते की नाही? त्याचे रोम रोम सतमय झाले होते.

या पृथ्वीतलावर प्रकृती किती आहेत? तर व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. पण प्रकृती अभिन्न होईल तर एकच वळण लागेल. तुकोबाच्या म्हणण्याप्रमाणे मग सोपे आहे की नाही?

प्रकृतीच्या वळणाप्रमाणे हरएक मानव जातो. प्रत्येकाचे वळण निरनिराळे असते. कोणी असत मार्गी जातो, त्याच्या इंद्रियाना असत वळण लागते. जशी ज्याची मनोभावना, तशी गती मिळते. जो खरोखर यात रममाण झाला, त्याच्यात आणि असत भक्तीच्या मानवात, जमीन अस्मानाचा फरक असतो.

सत् भक्तीने जाणारा भक्त माझ्या प्रत येतो आणि असत भक्तीने जाणारा माझ्या प्रत येत नाही. खरे की नाही? म्हणून असत भक्तीने जाणारा कदापिही माझ्याजवळ येणार नाही. (पुढे सुरु….२) ©️

You cannot copy content of this page