Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

समर्थ संदेश -२-©️

समर्थ संदेश -२-©️

या दरबारातील सेवेकर्‍यांची प्रकृती वेगवेगळी आहे, पण अंत:र्यामी तत्व एकच आहे, याची गती मिळाली आहे ना? सेवेकरी सत दृष्टीने, आदर भावनेने चालले आहेत का? ’ग’ची पीडा निर्माण झाली की एकमेकाबद्दल तिरस्कार वाटतो. ही ‘ग’ ची पीडा नष्ट करण्याचा प्रयत्न करा.

पाठचा बंधू एखादे वेळेस संपत्तीसाठी तुमच्याविरुद्ध वागेल. तो वाटा घेणारच! इतकेच काय तो तुमचा घात करण्यास कमी करणार नाही, पण एकाच तत्वाचे सेवेकरी हे गुरुबंधू आहेत. हा गुरुबंधू तुमच्या संपत्तीची आशा करील? घात करण्याचा प्रयत्न करील? तर नाही. तो तुम्हाला आदरच देईल. हे प्रेम अखंड टिकवण्याचा प्रयत्न करा. हे टिकवले तर वाद होणार नाहीत. याची खूण एकच, तुमच्या गुरुबंधूला कोणीतरी टिचकी मारीत आहे, हे ओळखून तरी गप्प बसावयास पाहिजे. गप्प बसल्यानंतर समतेचे वातावरण निर्माण होईल.

बाबांना जरी सांगितले तरी ते सेवेकऱ्यांची समजूत घालतात. एकापासून अनेक निर्माण होतात हे सेवेकर्‍यांना माहीत आहे. इतर मानवांचा प्रश्न सोडून द्या. येथील सेवेकऱ्यांना ही गती आहे की नाही? (पुढे सुरु…३)©️

You cannot copy content of this page