Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

काढीला बोल, न ठरे फोल, कृतीने बोल, पूर्ण करी……©️

काढीला बोल, न ठरे फोल, कृतीने बोल, पूर्ण करी……©️

अलख – आपल्या दरबारची चार तत्वे आहेत. जो बोल काढला, त्या बोलाला महत्व आहे. तो सत् करा. जी कृती हाती घेतली, ती पूरी करा. ते न करता, सेवेकरी दुसरेच करतो. जे गुरू, ज्यांचा शिरी हस्त पडला, त्यांनी मार्ग दाखविला, त्यांची ओळख ठेवणे, त्यांना पाहणे कठीण तितकेच सोपे देखील आहे. पण कसे? त्या मार्गाने गेलात तर! प्रथम शुध्दता पाहिजे. शुद्ध पाहिजे तो कसा? आंघोळीने नाही. त्यानें फक्त बाहेरचा मळ साफ होईल. आतला काळेपणा तो साफ कसा होईल? त्याला काय केले पाहिजे? त्याला एकच साधन, ते म्हणजे अखण्ड नाम ! त्या नामात राहशील तर मन साफ होईल. असे जर नसेल, या प्रमाणे सेवेकरी जर वागत नसेल, तर आपल्या कृतीनेच असत संचित घडवीत असतो. हरीच्या कृपेने सावरत असतात. सत कृतीने गेल्यास, हरीच्या कृपेने असत संचिताचा नाश होईल.

आपल्या सेवेकऱ्यास सदगुरू पदानेच मान मिळाला पाहिजे. कोणी प्रश्न विचारले, तर उत्तरे देता आली पाहिजेत. म्हणजे आपल्या सताचा पाया भक्कम असेल, तर ठामपणे उत्तर द्याल. मालिक छायेप्रमाणे मागे असतात. मालिक सांगताना पुष्कळ सांगतात, पण सेवेकरी आपल्या हाताने करून घेतात. मालिक काहीच करीत नाहीत.

सेवेकरी म्हणतील, येथून उतरल्यावर आसन रिकामे असते, तर आसन कधीही रिकामे नसते. मालिक येथेच बसलेले असतात. स्थूलांगी तिकडे जातात. आपण काहीही केले, तरी त्यांच्या नजरेतून सुक्ष्माहूनही सुक्ष्म सुटत नाही. ©️

You cannot copy content of this page