Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

श्री समर्थ एकचित्त – भाग दोन ©️

श्री समर्थ एकचित्त – भाग दोन ©️

दरबार हा दरबार आहे. आसन हे आसन आहे ! ज्या ठिकाणी बसाल त्या ठिकाणी दरबार आहे. त्या ठिकाणी आसन आहे. स्थुलाचे विवेचनावर पुढे निवेदन होईल. सेवेकर्‍यांचे सर्वस्व कोडकौतुक पुरविण्यात येईल. चारही देहावर विवेचन करण्याची वेळ आली तर जरूर विवेचन करण्यात येईल.

जशी संघर्षणे होतात, तसे सताकडून आदेश सुटत असतात. जे खेळ खेळावयाचे ते प्रत्यक्ष सत् खेळत नाही. जी लाघवी शक्ति, ती खेळ खेळत असते. काहीही स्थित्यंतरे झाली, उलथा-पालथ झाली तरी सत् ते सतच राहणार आहे. ते एकदा प्रकट झाले की, मग कोणालाही आटोपता येणार नाही. एक जरी सताचा किरण प्रगट झाला तरी तो कुणालाही सहन होणार नाही. आज जरी मायावी कृती दिसली नाही, तरी ती जरूर दिसण्यात येईल.

ज्या वेळेला संघर्षण चालले होते, समुद्रमंथन चालले होते, त्या वेळेला मानवी तऱ्हेने १४ रत्ने काढली. देव दानवांचा झगडा चालला होता. एवढे खरे की, संजीवनी आणि अमृत दोन बाजूला दोन ठेवली होती. ज्यांना सापडले त्यांनी पळविले. दिले कोणी कोणाला? संजीवनी महान विद्या आहे. शुक्राचार्यांनी जे साधले ते बृहस्पतीला साधता आले नाही. जी विद्या शुक्राचार्याला मिळाली, ती त्यांनी जतन केली. त्याने वाढवली. यामुळे दानवांची संख्या घटत नव्हती. म्हणून ती विद्या मिळविण्यासाठी कोणाला पाठवले. कच हा बृहस्पतिचा मुलगा. ज्योत उच्च पातळीची होती आणि त्याच्याकडून कार्य करून घ्यावयाचे होते. म्हणून त्याला पाठविण्यात आले. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page