Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

वेचलेले मोती….! ©️

वेचलेले मोती….! ©️

सद्गुरु पदाचा महिमा अगाध आहे. ज्याला जे दिले, त्याचा तो अमृततुल्य ठेवा कोणीही हिरावून घेणार नाही. सेवेकरी आपल्या कृतीस क्षणीक चुकत असेल, तर ती ठेव कृतीप्रमाने कमी कमी होत जाते. 

ज्याप्रमाणे अकार, उकार, ओंकार याची कोणतीही स्थिती रहात नाही, त्याप्रमाणे तो आपण स्वतःकडून सद्गुरु चरणांवर अर्पण करतो. 

सद् भावनेने, सत् आचरणाने जो सद्गुरू ठेवा जतन करतो, तो सद्गुरुमय होतो. अशा तऱ्हेने तो ठेव सद्गुरु चरणांवर अर्पण करतो. 

ज्यावेळेला हा संचिताचा ठेवा तयार होतो, तो दुसऱ्या योनीत फेकल्यानंतर, हा संचिताचा ठेवा त्याबरोबर फेकला जातो आणि ही अमृततुल्य ठेव ज्याला मिळाली, त्याचे संचित सद्गुरु माऊली आपल्या शिरावर घेते. 

असत थोडे जरी असले, तरी ते त्याच्या संचिताला पात्र होते. देवाण घेवाण आणि सद्गुरु कोण, हे ज्याला समजले तो सत् शिष्य महान कार्यांसाठी कर्तव्य करीत असताना कोणत्याही स्थितीचा विचार करीत नाही. 

माऊली तारक असते, मारक नसते. जो असत मार्गाने जातो, त्याला वठणीवर आणण्यासाठी अनेक तऱ्हेची लिला करावी लागते. 

मानवांचे शुद्धीकरण, मानव मायावी जाळ्यात गुरफटलेला आहे. ते जाळे तोडून सद्गुरु चरणांवर लीन करण्यासाठीं कृती करावी लागते. 

“सद्गुरु कोण?” हे ज्या सेवेकऱ्याने ओळखले नाही, त्याला सद्गुरु निराळे वाटतात. हा त्यांचा निव्वळ भ्रम आहे.

सेवेकरी सज्ञान असेल तर तमा न ठेवता शिक्षा झाली पाहिजे. अज्ञान असेल तर त्याला एखादी गोष्ट (माफ) आहे. सज्ञान असेल तर क्षमा नाही.

कैलासपतीला न ओळखण्या इतका दरबार असमर्थ आहे का? 

हुबळी, धारवाड सप्त शृंगीचे तत्व आहे. त्या ठिकाणीं बसलेला साधू जनका बरोबरची ज्योत आहे. जी जनकाची स्थिती तीच त्याची स्थिती आहे. 

दरबारच्या कर्तव्याला चुकल्या नंतर कितीही महान ज्योत असली, तरी शिक्षेला पात्र होते. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page