आदेश – आपल्या सेवेकऱ्यानी प्रत्यक्ष यावर पाहणी करावी. आसनावरून आदेश सुटल्यानंतर किती ठिकाणी, कोणत्या तऱ्हेने, कोणत्या तत्वाने, तो कुठे कुठे घुमत असतो याची जाणीव घ्यावी.
(तो आदेश) चराचर, परात्पर सर्वत्र घुमतो. आसनावरून आदेश सुटल्यानंतर तो आदेश कोणाला आहे, मग तो समाधीत असो, अगर कोणत्याही उपाधीत असो, याची जाणीव घेऊन, एका क्षणात दरबारात खडे होतात. सेवेकऱ्यांचे जीवन मायावी असले तर आदेशाचे महत्व काय आहे? आदेशाचे महत्व प्रत्यक्ष प्रकाशात सेवेकऱ्यानी घ्यावयास पाहिजे.
आदेश कोठून, कोणाचा आहे? तो तीन ताळ, सप्त पाताळ, एकवीस स्वर्ग घुमत असतो. अशा आदेशाची अवहेलना केल्यानंतर काय स्थिती होते, हे दरबारात पाहतच आहात. आदेश म्हणजे आदेश – त्याची किंमत प्रत्येक सेवेकऱ्याने ठेवलीच पाहिजे. हा नाद एकाचाच नसून, तो ऐकण्यासाठी, झेलण्यासाठी अनेकांची धडपड असते. चरणांची सेवा करणारे फार थोडे आहेत. प्रत्येक युगात सर्वच चरणावर लीन होणारे असते, तर अवतार कार्य घ्यावे लागले नसते. (१) ©️