Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

अलख….. प्रवचन (१) ©️

अलख….. प्रवचन (१) ©️

अलख –

       ज्ञानाची मूर्ती म्हणजे कोणती मूर्ती? कोणते नांव? असा अविनाशी आत्मा म्हणजे स्वयम् प्रकाश! त्यालाच पाहिले पाहिजे! 

       आपल्या शरीर रुपी पिंजऱ्यात कसे आरुढ आहेत याची जाणीव सेवेकऱ्यांनी घ्यावयास पाहिजे. जाणीव घेतल्यानंतर याच मार्गाने ज्योत गेल्यानंतर, पायरीने मग ते मालिक कसे आहेत, त्यांना आकार आहे कां? ते कोणत्या तऱ्हेने सांगतील. 

       मालिक प्रगट करुन सांगतात. पण केव्हा? या मार्गाने जातील तेव्हा! तो एकच मार्ग! त्या मार्गाने प्रत्येकाने चालावयास पाहिजे. हे आपले सद्गुरू, मालिक, ते आपल्या सेवेकऱ्यांचा कस घेतात. तो कसा? सेवेकऱ्यांस जाणीव राहत नाही. ज्यांच्याशी हसत बोलतात, त्यांचाच कस असतो. जरी मालकांनी कस घेतला, तरी त्या सेवेकऱ्यांस दुसऱ्यांच्या दाराशी पाठविणार नाहीत. तो वाईट असो, कसाही असो. सुधारेल. जर पाठविले तर इतर ज्योती सहज विचारतील तू कुठे जात असतो? तर सद्गुरू दरबारात! मग सेवेकऱ्यांची अब्रु जाणार नाही कां? सेवेकऱ्यांची अब्रु गेली म्हणजे मालकांची जाते.

       अगदी सानिध्यातील ज्योत असली, तरी तिला मान जास्त नाही. सर्व सारखे! सर्वांना मान सारखाच! प्रत्येकाच्या अंतरी अविनाशी आत्मा आहे. कांहीना वाटते, सानिध्यात म्हणून बाबा त्यांना विचारतात. पण त्यांचे ठिकाणी भेदभाव नाही. सर्वांना सारखेच वागवतात. माझ्या बद्दल बाबा कां बोलतात? तू सरळ मार्गाने जावे म्हणून सांगतात! केवळ आपल्या सेवेकऱ्यांस बचावण्यासाठीच प्रयत्न करतात. वेळोवेळी टोचणी ही सुधारण्याकरीता देतात. सेवेकरी सुधारला तर दुसऱ्या ठिकाणी सहज मान मिळतो. ©️

You cannot copy content of this page