Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री विठ्ठल – या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला आहे. लिनता, नम्रता, शांती आहे. “देही देखीली पंढरी | आत्मा अविनाशी विटेवरी ||” असे एका संताने म्हटले आहे. त्याने प्रत्यक्षातही अनुभवले आहे. ज्या ठिकाणी शांती आहे, तेथे तत्त्व असणारच. जेथे तत्त्व आहे, तेथे शांती आहे. शांती हिच रुक्मिणी आहे. याच्यापेक्षा महान शक्ती आहे तिला महामाया म्हणतात. आदिशक्ती म्हणतात. अन् ती सर्व व्यापून सुद्धा अलिप्त आहे, असा तिचा व्यवहार चालतो. ती शक्ती असूनही अलिप्त आहे. ती शक्ती आमच्याकडून कर्तव्य करून घेते.

ही सृष्टीची रचना आमच्या हाती जरी असली, तरी संदेश सुटल्याशिवाय कृती होत नाही. आदेश सुटतात, त्यांची तत्त्वाला जाणीव असते. जोपर्यंत आदेश सुटत नाहीत, तोपर्यंत काही एक करता येत नाही. सर्वस्व त्यांच्या आदेशाप्रमाणे कार्य होते. असे ते सर्वस्वांचे प्रमुख आहेत त्यांना पाहता येत नाही. त्यांचे वर्णन करता येत नाही. हे त्रिभुवन सर्वस्व सतमय आहे. सताने भरले आहे. परंतु प्रकृती भिन्न असल्या कारणाने ओळख नाही. तत्व सर्व ठिकाणी एकच आहे, पण ज्याने गती घेतली, अनुभव घेतला त्याला सर्व ठिकाणी मी तू एकच आहे असा अनुभव येतो. असताला अनुभव नाही. सत् हे सर्व ठिकाणी भरले आहे. त्यांच्याच आदेशाप्रमाणे आम्ही कार्यप्रविण असतो. ते सर्वस्वाचे निधान आहेत. आपण सर्वस्व सेवेकरी आहोत. ©️

You cannot copy content of this page