Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सुख आणि दुःख ©️

सुख आणि दुःख ©️

मानवाने सुख आणि दुःख हे दोन विभाग केलेले आहेत. पण सुख कशाला आणि दुःख कशाला म्हटले आहे?

कोट्याधीश हा सुखी आहे का? मग सुखी कोणाला म्हटले आहे? कोट्याधीश सुद्धा सुखी नाही. संपत्ती रेलचेल असली तरी तो दु:खी असतो. आणखी आणखी हे सारखे त्याच्या डोक्यात भरलेले असते.

दुःखाची व्याख्या म्हणजे सदोदीत त्रास, काबाडकष्ट ही दुःखाची व्याख्या आहे. पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे जे दुःख, ते सुद्धा निवारण होते. निवारण करू शकतो.

सत सुख म्हणजे भक्ती मार्गाने जाणे. सद्गुरुना डोळे भरून पाहणे. एकचित्त लावून बसणे. त्यालाच ते सुख मिळते. देहाला, जडत्वाला विसरला की त्या सुखाची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. तेच खरे सच्चिदानंद सुख होय.

हे करायला मानवाला त्रास होतो, पण तो त्रास एका क्षणात दूर होतो. त्या सुख सागरात डुंबू लागला मग मात्र त्याला कशाचीही चिंता भेडसावत नाही. तो सदा सुखी असतो. म्हणून सुख पाहिजे ते कोणते सुख पाहिजे? याचा विचार सेवेकऱ्यांनी करावा. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page