Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

सुख आणि दुःख ©️

सुख आणि दुःख ©️

श्री समर्थ मालिक – सुख पाहता जवापाडे | दुःख पर्वता एवढे || सद्गुरुं शिवाय दुःखाचा भार कोणीही घेऊ शकत नाही अन् शकणार नाही. सद्गुरु नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीवर असतात. कोटी वर्षे होऊन गेली आहेत.

भक्ताला आपले दुःख पूर्णत्वाने भोगावे लागते. तरीसुद्धा त्या दुःखाचा अर्धा भाग सद्गुरु वाहत असतात. आसनावरुन अनुग्रह देताना, सेवेकऱ्यांना काही तत्वे दिलेली असतात. त्याच्या संचिताप्रमाणे असणारे दुःख ते अर्धे घेतात व तत्त्वाचे पालन करण्यास सांगतात.

नाम दिल्यानंतर नामाच्या सहाय्याने उजाळा होत होत जातो. पूर्ण प्रकाशात फेकल्यानंतर प्रत्यक्ष सद्गुरू त्याच्याबरोबर असतात. सेवेकर्‍याला थोडा जरी त्रास झाला, तर तो पाठीपुढे होतो. पूर्वीचे भक्त असे नव्हते.

सद्गुरु ही साधीसुधी चीज नाही. सद्गुरु हे सद्गुरू आहेत. सद्गुरु आपल्या सत भक्तासाठी धाव घेतात. हे सेवेकर्‍यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करणे. सेवेकरी फक्त दुःखच सांगतो. सुख सांगत नाही. आत्ताच्या सेवेकर्‍यांना त्रास झाला की ताबडतोब आदेश सुटत असतात. पूर्वी असे नव्हते. (पुढे सुरु…२) ©️

You cannot copy content of this page