Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

सद्गुरुं शिवाय दुःखाचा भार कोणीही घेऊ शकत नाही ©️

सद्गुरुं शिवाय दुःखाचा भार कोणीही घेऊ शकत नाही ©️

श्री समर्थ मालिक – सुख पाहता जवापाडे | दुःख पर्वता एवढे ||

सद्गुरुं शिवाय दुःखाचा भार कोणीही घेऊ शकत नाही अन् शकणार नाही. सद्गुरु नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीवर असतात. कोटी वर्षे होऊन गेली आहेत. भक्ताला आपले दुःख पूर्णत्वाने भोगावे लागते. नाहीतर त्या दुःखाचा अर्धा भाग सद्गुरु वाहत असतात.

आसनावरुन अनुग्रह देताना, सेवेकऱ्यांना काही तत्वे दिलेली असतात. त्याच्या संचिताप्रमाणे असणारे दुःख ते सद्गुरु अर्धे घेतात व तत्त्वाचे पालन करण्यास सांगतात.

नाम दिल्यानंतर नामाच्या सहाय्याने उजाळा होत होत जातो. पूर्ण प्रकाशात फेकल्यानंतर प्रत्यक्ष सद्गुरू त्याच्याबरोबर असतात. सेवेकर्‍याला थोडा जरी त्रास झाला, तर तो पाठीपुढे होतो. पूर्वीचे भक्त असे नव्हते.

सद्गुरु ही साधीसुधी चीज नाही. सद्गुरु हे सद्गुरू आहेत, तेच भक्ताला भगवंताप्रत जाण्याचा राजमार्ग दाखवितात, भगवंताचे दर्शन घडवितात. सद्गुरु आपल्या सत भक्तासाठी धाव घेतात. हे सेवेकर्‍यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करणे. सेवेकरी फक्त दुःखच सांगतो. सुख सांगत नाही. आत्ताच्या सेवेकर्‍यांना त्रास झाला की ताबडतोब सद्गुरु आदेश सोडत असतात. पूर्वी असे नव्हते. ©️

You cannot copy content of this page