Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सत् सेवा ©️

सत् सेवा ©️

सत शुद्ध अंत:करणाने प्रेरित होऊन सद्गुरु चरणांवर बहाल केलेली सेवा थोडी का असेना ही पूर्णत्वाने रुजू आहे. हे करताना सेवेकरी, आतून आणि बाहेरून हेलावून गेला पाहिजे. करायचे म्हणून करायचे, हे ओझे म्हणून ठेवले आहे, म्हणून करायचे, तर हे केलेले चरणांवर रुजू होत नाही. पण, अंतःकरणापासून आपण केले, तर ते प्रेमभराने रुजू करावे लागते. सद्गुरूपद हे असे आहे. त्यांना काय पाहिजे, हे सेवेकऱ्याने जाणवयाचे असते.

गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनाचे महत्त्व ज्या सेवेकऱ्याने ओळखले, जाणले त्याला सत सेवेकरी हे नामभिधान आहे. गुरुमुखातून मिळालेला उपदेश, ज्यांच्या रोमारोमातून भिनला आहे, त्यांच्यासाठी हा शुभदिन “गुरुपौर्णिमा” आहे. सद्गुरु मुखातून, सेवेकऱ्याकडून पूजेची अपेक्षा नसते, पण ते सेवेकर्‍यांनी जाणवयाचे असते.

आसनाचा सेवेकरी झाल्यानंतर, प्रथम सद्गुरुमय व्हावे लागते. सेवेकरी सद्गुरू चरणात लिन होणे म्हणजे काय? तर सर्वस्व स्थुल, सूक्ष्म, कारण, महाकारण सद्गुरुना अर्पण करणे. मग शेवटी काय राहते? तिच सद्गुरु चरणात लिन होऊन शुद्ध अंत:करणाने केलेली सेवा, ही रुजू असते. (पुढे सुरु….२)©️

You cannot copy content of this page