Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

सत् भक्तिचा मार्ग ©️

सत् भक्तिचा मार्ग ©️

कुंभ मुनी – सत तत्वात रममाण होण्यासाठी, सत् भक्तिच्या मार्गाने जाणाऱ्या ज्योती क्वचितच असतात. समर्थांना श्रद्धायुक्त ज्योती पाहिजेत. श्रद्धा डळमळीत असली तर या मार्गात तो टिकू शकणार नाही. काहीही होवो, श्रद्धा डळमळू देता कामाची नाही. हे स्वयमेव तत्व आहे.‌ याचा वास अंत:र्यामी आहे. ३३ कोटी दैवते आपल्यातच आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आपल्यातच आहेत. ३६ कोटी गण आपल्या हृदयात आहेत. यावर आरुढ एकच स्वयमेव तत्व आहे. ते सर्वस्वाचा कारभार हाकतात. या दरबारातील सेवेकर्‍यांनी विचारपूर्वक या ठिकाणी श्रद्धायुक्त भावनेने सत कर्तव्य करीत राहणे.

श्री समर्थ मालिक – सत् हे तत्व फार न्यारे आहे. माझा अंत कोणीही घेणार नाही. अंत सापडणे दुरापास्त आहे. कार्य करून कसे घ्यायचे हे माझ्या जवळ आहे. कर्तव्य करावयाचे, त्याने कर्तव्य करीत राहणे. त्याचे फळ अखंड हे देणारच ! ज्याची कृती सत्, त्याला सतफळ मिळते. ज्याची कृती असत, त्याला पुढचा मार्ग कसा त्याप्रमाणे मिळतो. त्याच्याकडून अनिती घडल्यानंतर, तो आपोआप दूर लोटला जातो. पण सेवेकऱ्यांनी थोडीशी कळ सोसली पाहिजे. कर्तव्य कोणाकडून करून घेईन आणि कोणाकडून नाही हे सांगता येत नाही. जी घडण घडते ती चांगल्यासाठीच घडते. थोडेसे कष्ट आहेत, त्याचे फळ आज ना उद्या मिळतेच !

पूर्वीसारखा कस आत्ताच्या सेवेकऱ्याला नाही. ज्या सेवेकऱ्याला कसून घ्यावयाचे आहे, त्याला कसून घेणारच ! पूर्वीच्या कर्म संचिताप्रमाणे ज्या ज्योती ठाम आहेत, श्रद्धा युक्त आहेत त्यांना मी जाऊ देणार नाही. जो मानव मनाच्या आधीन झाला, मन पवनाच्या घोड्यावर आरुढ झाला, त्याला काय करावे, याची गती मला चांगली आहे. अशांना स्थिरता मिळणार नाही. त्रास झाल्याशिवाय घर्षण राहणार नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page