Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

संक्रमण

संदेश

हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व तो कितपत आहे हे सांगता येणार नाही. ज्यावेळेला चत्वार खाणींची निर्मिती झाली, त्यात मानव हा श्रेष्ठ प्रतीचा आहे. त्याच्याकडे एकच तत्व देऊन ठेवले आहे, ते म्हणजे सरस्वती ! त्याचा त्याला उपयोग करता येत नाही. तेव्हा ती असून नसून फोल आहे. सरस्वतीचा उपयोग कुठे व कोणत्या तऱ्हेने करावा याची जाणीव देणे. सेवेकर्‍यांनी सरस्वतीचा उपयोग दुष्ट कर्तव्याला बळी पडण्यासाठी करू नये व बळी पडू नये हे संदेश आहेत. याबाबतीत आसनाला पूर्णत्व अधिकार आहेत. मानव अधोगतीच्या मार्गाने जात असतील, तर आपले जे नियम आहेत, साम-दाम-दंड-भेद याप्रमाणे कर्तव्य करणे. नाहीतर पुढची तर्‍हा वापरण्यास हरकत नाही.©️

You cannot copy content of this page