Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

वर्तणूक कशी ठेवावी….©️

वर्तणूक कशी ठेवावी….©️

ही प्रवचने कशासाठी आहेत? तर सेवेकर्‍यांनी सुधारण्यासाठी. नाहीतर त्याच्यासारखा अभागी तोच ! सताला लाघव करण्यास संधी न देणारे सेवेकरी त्या पात्रतेला अजून गेलेले नाहीत. पण मला लाघव करण्यासाठी चांगला वाव मिळतो, म्हणून ते कर्तव्य मी मायेकडून करून घेतो.

मी करूनही अकर्ता ! सुखदुःखाच्या वेगळा आहे. वेगळा असून सुद्धा पाप पुण्याच्या निराळा आहे. सर्वव्यापक असूनही अलिप्त आहे. पण सेवेकरी असताच्या आधीन बनतात, मायेच्या आधीन बनण्याचा प्रयत्न करतात, म्हणून माया त्याला सोडत नाही. यामुळे सेवेकरी फसला जातो. म्हणून त्याच्यावर थोडी तिरकी नजर करावी लागते. मग मात्र सेवेकरी गयावया करीत असतो.

अजूनही संदेश आहेत. चुकू नका ! एकमेकांची मने कलुषित करण्यासारखे काही करू नका. सेवेकरी आपुलकीच्या प्रेमात गटांगळ्या खाऊ लागला तर मला लाघव करावयास वाव मिळेल का? एकमेकांनी प्रेमाने वागावे. आपली शिस्त ही ठेवलीच पाहिजे. शिस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. शिस्तीचा भंग करू नका.

बोल टाकताना विचार करून टाका. जरी टाकले, तरी विचारांती टाका. आपुलकी निर्माण होण्याचा संभव असेल तर टाका. तामसी वृत्तीने टाकलेत तर सेवेकरी नाराज होतो. आता इथून पुढे तरी असे करू नका. आसनाधीस्त नसताना कोणी कोणास बोलू नये. नाराजी सोडून द्या. एकाच प्रेमाने, समतेने सेवेकरी राहिला तर सेवेकर्‍यांची वागणूक पाहून मला सुद्धा प्रेम निर्माण होईल. प्रेम आणि प्रेम रस कसा पाहिजे? तर गोड अमृताप्रमाणे पाहिजे. अमृता समान असेल तर सेवेकर्‍याच्या मनावर त्याचा परिणाम होईल का? अमृताप्रमाणे प्रेम रस वाढला तर तो खाऊ शकेल की नाही. तेव्हा याप्रमाणे वर्तणूक ठेवा. हे संदेश आहेत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page