Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

मी शरण आहे, मग मी श्रेष्ठ कसा? ©️

मी शरण आहे, मग मी श्रेष्ठ कसा? ©️

श्री विठ्ठल – मी जर श्रेष्ठ म्हणावे, तर मी कोणाला तरी शरण आहेच, मग मी श्रेष्ठ कसा? अनंत लाघवी शक्ती आहे. ती लाघव करावयास लागली तर अंत मिळणार नाही. थोडीशी अहंकाराची झलक आली की असे होते. या अहंकारात ओळख राहत नाही. ज्याने सृष्टीची रचना केली, ज्याला रंग, रुप, आकार वगैरे काही नाही, सर्व ठिकाणी व्यापक असूनही अलिप्त असणारे जे परम निधान तत्व, त्या तत्त्वापुढे आम्ही तुच्छ आहोत.

भक्त करणे न करणे हा त्यांचा अधिकार आहे. हल्लीचा काळ फार वेगळा आहे. कारण थोडेसे शिक्षण झाले की त्यांना वाटते मी कोणीतरी विशेष आहे. कलीयुगात हवा कशी आहे ते मी सांगतो. हे कलियुग आता कलू लागले आहे. कोणीतरी भक्ताने माझे दर्शन घेतले आहे का? सतभक्त असेल तर त्याला पंढरपुरला येण्याची काय गरज आहे? जो निष्काम सतशुद्ध भावनेने त्या ठिकाणी येतो, त्याला मी अवश्य भेटतो. सकाम गतीने येणारे किती आहेत, तिकडे मी लक्षच देत नाही.

एकच तत्व अनेक नावाने, अनेक रूपाने नटलेले आहे. तेच ते आहेत, आम्ही नव्हेत.

जन्माला आल्यानंतर नाव गाव काही नसते पण नंतर तुम्ही ठेवता. तेव्हा येसी उघडा, जासी उघडा ! येताना काही नाही, अन् जाताना पण काही नाही. कांहीतरी सांगाती घेऊन जा. ते काय? याचे शोधन तुम्ही करा. जे जन्मोजन्मीचे सुटत नाही, ते काय आहे, ते आपण सांगा. (समाप्त)©️

You cannot copy content of this page