Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

मायेच्या वेष्टणातून पलीकडे जायचे असेल तर……अक्षय मुनी©️

मायेच्या वेष्टणातून पलीकडे जायचे असेल तर……अक्षय मुनी©️

अक्षय – सद्गुरु कृपेनें २ ते २|| हजार वर्षांपूर्वी ज्याची तहान लागली, ज्याचे चिंतन करीत बसलो, त्या सद्गुरु माऊलींचे अखंड दर्शन व्हावे ही इच्छा आहे. भीमा आणि घोड नदीचा जेथे संगम त्या ठिकाणी असतो.

मायेच्या जाळ्यात गुरफटणाऱ्याला, अखंड दर्शन नाही. ते जाळे तोडून गेल्यानंतरच दर्शनाचा लाभ मिळेल. माया ही अमोल चीज आहे. जो मायावी जाळ्यात पूर्णपणे जखडून गेला, तो त्यातून केव्हाही सुटणे शक्य नाही. जो हे जाळे तोडून सद्गुरु शोधासाठी धावला, त्याला सद्गुरु दूर नाहीत.

सद्गुरु माऊली फार दयाघन आहे. ज्याने पूर्णत्वाने अंत लावला, त्याला मायेचे बंधन नाही. आम्ही म्हणाल तर, २००० हजार वर्षांपासून तळमळत होतो. ते दर्शन आज पूर्णत्वाने मिळाले. मायेचा अंत, मायेचा ठाव, कुठपर्यंत आहे, हे ज्याला कळले तोच सद्गुरुंचा ठाव घेतो. ज्याला हे गूढ कळले नाही, तो ठाव कदापिही घेऊ शकणार नाही. माया ही अमोघ शक्ती आहे. त्रिभुवन व्याप्त आहे. याच्या फार निराळे असे सद्गुरु ठिकाण आहे. ते पहाण्यासाठी मायेच्या वेष्टनाचे खंडन करावे लागते आणि ते खंडन करावयाचे असेल तर, ते अखंड नामानेच खंडन होवू शकते. या नामावर कोणतेही अस्त्र चालू शकत नाही. ज्याला मायेच्या वेष्टणातून पलीकडे जायचे आहे. मायेचे बंधन तोडावयाचे आहे, त्यानें ते नाम सद्गुरु मुखातून मिळविले पाहिजे. त्या नामाच्या अखंड ध्यानाने व ध्यासानेच सद्गुरु दर्शन, सद्गुरुंचा ठाव मिळतो. यांना कोणत्याही प्रकारची भिती नाही. नामाचा महिमा अगाध आहे. याची शक्ती फार बलाढ्य आहे. परंतु नाम मिळाल्यानंतर त्याला वेळ – काळाचे अगर ठिकाणाचे बंधन नाही. असे हे एकच श्रेष्ठ नाम आहे. नामाच्या (गतीने) जाणारा केव्हाही तरुनच निघतो. नाम हेच तारक आहे. मानव रुपी नौका तरुन जाण्याला नाम हे एकच साधन आहे. या नाम रुपी नौकेच्या साहाय्याने माया रुपी नदी तरुन, तो पैलतिरी जातो. पैलतीरी गेल्यानंतर सद्गुरूना डोळे भरून पाहतो. सर्वस्व सार्थक या नामातच आहे. याच्या निराळे काही नाही.(समाप्त)©️

You cannot copy content of this page