Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

मानवाला भक्तीचे अंग कसे मिळते? – श्री विठ्ठल –©️

मानवाला भक्तीचे अंग कसे मिळते? – श्री विठ्ठल –©️

मानवाला भक्तीचे अंग कसे मिळते? पूर्व जन्मीच्या संचिताप्रमाणे, परमेश्वराला पाहण्याची मानवाला इच्छा निर्माण होते आणि त्याप्रमाणे त्याची वाटचाल होते. नंतर त्याला सानिध्यात घेतात व भक्तीचे द्वार दाखवितात.

भक्तीचे मूळ दोन अक्षरात आहे. त्यातच त्रिभुवन सामावलेले आहे. सताशिवाय त्याचे स्पष्टीकरण कोणी करणार नाही. त्याचा उहापोह समजणे कठीण आहे. अशी ही गती कोणालाही नाही. जे सानिध्यात आहेत तेच रममाण होतात. इतरांना होता येणार नाही.

“भक्ती करायची म्हणून करायची, कोणी सांगितले म्हणून भक्ती मार्गाने चालू लागला, पण कष्ट नाही, काही नाही तर त्याला समर्थ भेटणे कठीण आहे. पण सताला माहित आहे कोणाला सानिध्य द्यावयाचे आणि कोणाला नाही.”

आम्हाला सुद्धा तेच आदेश आहेत. ज्याला याची ओळख त्यालाच सानिध्यात घेतात. घेतले जाते. अखंड जागृत अशी जी महान शक्ती ते सर्वस्वाची पाहणी करतात. मानवाचा उजाळा पाहतात.

मानव देऊन देऊन काय देणार आहे? मानवात काय आहे? त्या महान शक्ती पासूनच मानव निर्माण झाला. मग देऊन मानव काय देणार? मानवाला गती नाही. त्याला वाटते तो करतो, ते सर्व तो करतो. मी जर काही केले नाही, तर मला कोण आणून देणार? पण जी कर्तुम अकर्तुम शक्ती आहे तीच सर्वस्व घडवून घेते. त्याचा मानवाला अंत नाही आणि तो सद्गुरुं शिवाय कळणे फार कठीण आहे. मानव सताच्या आधीन गेला तर ईश्वर पाहता येईल. पुढे सुरु….२©️

You cannot copy content of this page