Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

महामुनी कार्तिक – सद्गूरु म्हणजे काय? ©

महामुनी कार्तिक – सद्गूरु म्हणजे काय? ©

सद्गूरु म्हणजे काय? मालिक हे तत्व फार वेगळे आहे. त्याला आदी नाही, मध्य नाही आणि शेवटपण नाही. रूप नाही, रंग नाही. आकार, विकार कांहीं एक नाही. त्यांचे वर्णन, स्थिती, गती कांही एक सांगता येणार नाही. केवळ आपल्या भक्तांचे कोडकौतुक पुरविण्यासाठी चैतन्यमय बालस्वरुप प्रगट करतात. खरे रूप पाहण्यास गेल्यास पाहता पाहता त्याच ठिकाणी लय होतात. सांगता येत नाही. असे ते मालिक आणि सद्गुरू एकच आहेत.
कार्यासाठी निरनिराळे अवतार धारण केलेले आहेत.

अवतार कार्ये जरी निरनिराळी असली, तरी देव एकच आहे. ईश्वर एकच आहे. जरी त्यांनी अनेक रूपे धारण केलीत, तरी ती सर्व एकाच ठिकाणी लय होतात. त्यांचे विवरण मी अज्ञान बालक काय करु शकणार आहे?
जे पाहिले, प्रत्यक्षात अनुभव घेतात, तेच विवरण करीत आहेत. अशा त्या मालकांच्या ठिकाणी कोणतीही चूक लपून राहणे शक्य नाही. सर्वांच्या अंत:र्यामी सर्व ठिकाणी व्याप्त असून सुद्धा ते नामानिराळे आहेत. त्यांना सर्वस्वाची माहिती असते. सर्व गोष्टी त्यांच्या ध्यानात असतात.

त्रिभुवनातील प्रत्येक वस्तूत मालिक परिपूर्ण भरलेले आहेत. मालिक नसतील तर त्यांत चेतना निर्माण होणार नाही. त्रिभुवनातील एकही पान त्यांच्या सत्तेशिवाय हलत नाही. ते एकाच ठिकाणी स्थीर होऊन त्रिभुवनाचा कारभार हाकतात. सर्व सुत्रांची दोरी त्यांच्याच हातात आहे.
खरे रूप पाहण्यास गेले, ते त्याच ठिकाणी लय झाले. सद्गुरू हा बोल फारच अमोलीक आहे. ते पूर्णत्वाने विचार करुनच बोल बाहेर फेकत असतात. (समाप्त) ©

You cannot copy content of this page