Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

मन आणि माया (२) ©️

मन आणि माया (२) ©️

अक्षय मुनी – सद्गुरु कृपेनें २ ते २|| हजार वर्षांपूर्वी ज्याची तहान लागली, ज्याचे चिंतन करीत बसलो, त्या सद्गुरु माऊलींचे अखंड दर्शन व्हावे ही इच्छा आहे. भीमा आणि घोड नदीचा जेथे संगम त्या ठिकाणी आम्ही असतो. आम्ही म्हणाल तर, २००० हजार वर्षांपासून तळमळत होतो. ते दर्शन आज पूर्णत्वाने मिळाले.

पुढे ते म्हणतात, “माया ही अमोल चीज आहे. जो मायावी जाळ्यात पूर्णपणे जखडून गेला, तो त्यातून केव्हाही सुटणे शक्य नाही. जो हे जाळे तोडून सद्गुरु शोधासाठी धावला, त्याला सद्गुरु दूर नाहीत. सद्गुरु माऊली फार दयाघन आहे. ज्याने सद्गुरूंचा पूर्णत्वाने अंत लावला, त्याला मायेचे बंधन नाही.

मायेचा अंत, मायेचा ठाव, कुठपर्यंत आहे, हे ज्याला कळले तोच सद्गुरुंचा ठाव घेतो. ज्याला हे गूढ कळले नाही, तो ठाव कदापिही घेऊ शकणार नाही. माया ही अमोघ शक्ती आहे. त्रिभुवन व्याप्त आहे. याच्या फार निराळे असे सद्गुरु ठिकाण आहे. ते पहाण्यासाठी मायेच्या वेष्टनाचे खंडन करावे लागते आणि ते खंडन करावयाचे असेल तर, ते अखंड नामानेच खंडन होवू शकते.

या नामावर कोणतेही अस्त्र चालू शकत नाही. ज्याला मायेच्या वेष्टणातून पलीकडे जायचे आहे. मायेचे बंधन तोडावयाचे आहे, त्यानें ते नाम सद्गुरु मुखातून मिळविले पाहिजे. त्या नामाच्या अखंड ध्यानाने व ध्यासानेच सद्गुरु दर्शन, सद्गुरुंचा ठाव मिळतो. यांना कोणत्याही प्रकारची भिती नाही. नामाचा महिमा अगाध आहे. याची शक्ती फार बलाढ्य आहे.

नाम मिळाल्यानंतर त्याला वेळ – काळाचे अगर ठिकाणाचे बंधन नाही. असे हे एकच श्रेष्ठ नाम आहे. नामाच्या (गतीने) जाणारा केव्हाही तरुनच निघतो. नाम हेच तारक आहे. मानव रुपी नौका तरुन जाण्याला नाम हे एकच साधन आहे. या नाम रुपी नौकेच्या साहाय्याने माया रुपी नदी तरुन, तो पैलतिरी जातो. पैलतीरी गेल्यानंतर सद्गुरूना डोळे भरून पाहतो. सर्वस्व सार्थक या नामातच आहे. याच्या निराळे काही नाही.” ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page