Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

मनामध्ये गढूळपणा ठेवू नका ©️

मनामध्ये गढूळपणा ठेवू नका ©️

श्री समर्थ मालिक – महान महान योगी, महान तपश्चर्या केलेल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या नाहीत, पण या सानिध्यातल्या ज्योती त्या पदाला आहेत. हे त्यांनी ओळखले पाहिजे व त्याप्रमाणे आपली कृती ठेवली पाहिजे. माझे कर्तव्य काय? अन् मी कोणाचा सेवेकरी? मी काय करतो अन् काय केले पाहिजे? कोणत्या तऱ्हेने वाटचाल केली पाहिजे? याचा पूर्णत्वाने विचार करणे. सेवेकऱ्यांनी शुद्ध होण्याचा प्रयत्न करावा. एवढे तरी करा. याच जन्मी कमवायचे असेल तर आत्ताच कमवून घ्या. भंडार भरलेला आहे पण लुटणारा पाहिजे. नाही पेक्षा त्याचा उपयोग काही नाही.

संचिताची घडण ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे सेवेकर्‍यांना माया मिळते. पण सेवेकऱ्यांना केव्हाही उपाशी ठेवणार नाही. मायेला निर्माण करणारा तुमच्या सानिध्यात असताना माया म्हणजे काय? माया कोठे जाणार आहे?

इतकेच आहे, बऱ्याच वर्षापासून दरबारच्या सेवेकऱ्यांना संदेश आहेत – एकाच जीवात, एकाच रज्जूत आपण डूंबून रहावे ही समर्थांची अपेक्षा असते. हेवे-दावे, मनाचा कलुषितपणा, कुणालाही नाराज न करणे, हे आपण आपले समजले पाहिजे. माझा कोणताही गुरुबंधू भगिनी नाराज होऊ नये अशीच मनाची स्थिती प्रत्येक सेवेकर्‍यांने ठेवली पाहिजे. मन शुद्ध स्फटिका सारखे ठेवले पाहिजे, तरच कर्तव्याला शोभा येईल. मनामध्ये गढूळपणा ठेवल्याने शोभा येणार नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page