Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

भक्ति – साधी आणि सोपी – (2)©️

भक्ति – साधी आणि सोपी – (2)©️

बाबा – अविनाशी म्हणजे काय?

अलख – ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला अविनाशी म्हणतात. तोच आत्मा होय. ज्योत बाहेर पडताना हाच अविनाशी आत्मा बाहेर पडतो. तो (बाहेर) गेल्यानंतर हा देह अचेतन पडतो. अविनाशी म्हणजे सर्वस्व, म्हणजेच आत्मा होय. म्हणजेच सदगुरू होय.

आपले सदगुरू पाठीमागे असताना, सेवेकऱ्याला भीती आहे काय? म्हणजेच अविनाशी आत्मा ज्योत बाहेर पडताना अविनाशी आत्मा घेण्यासाठी मालिकच प्रत्यक्ष खडे असतात. तो कसा आहे, ह्याची प्रत्येक सेवेकऱ्याने जाणीव घ्यावयास पाहिजे. त्यांच्यात लय व्हावयास पाहिजे. त्याचा ठाव प्रत्येक सेवेकऱ्याने घ्यावा.

तो (ठाव) कसा मिळेल? तर सेवेकरी त्या वळणाने गेल्यानंतर मिळेल. आचार, विचार, उच्चार, कृती सर्वस्वी सत् (हवी)! सत् नामस्मरणात दंग (असावयास पाहिजे) ! असे राहिल्यास त्यांचा ठाव मिळेल.

सेवेकरी म्हणेल, अविनाशी आत्मा आमच्यात आहे, तर आमच्या कडून वाईट कृती का घडते? असत कार्य का घडते?

सेवेकऱ्यांचे मन वाईट कृती करीत असते. सेवेकऱ्याने बोल सत काढला तर कृती सत् होत असते. सेवेकऱ्यांची मनें त्याप्रमाणे कृती होत असते. ते कां होते? ज्यांचा सताचा नीतीमत्तेचा पाया शुद्ध आणि मजबूत असेल, तर तो घसरणार नाही. हाच पाया डळमळीत झाला, तर तो घसरतो.‌ अविनाशी काय करणार आहे? (Contd….3)©️

You cannot copy content of this page