Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

प्रेम सुत्र दोरी – ४-©️

प्रेम सुत्र दोरी – ४-©️

आसनाधीस्त म्हणतात, “आसनाधीस्तानी कोणावर अवलंबून राहावे?” भगवंत भक्तावर अवलंबून असतो व भक्त भगवंतावर अवलंबून असतो. मग आता तुमच्या सद्गुरूंनी किंवा आसनाधीस्तानी कोणावर अवलंबून राहावे?

सेवेकऱ्यांनो, माझे बोल शांत आहेत. सद्गुरु ज्ञान देतात. तुम्हीच सांगावे, आसनाधीस्तांनी कोणावर अवलंबून राहावे? भक्तावर अवलंबून राहावे? भक्त आसनाधीस्तांचे प्रणव गुप्त ठेवतात का नाही? गुप्त पत्र वाचलेल्या दिवशी किती सेवेकरी हसत होते व किती सेवेकरी गप्प होते? जे हसले ते का हसले, कोणाला हसले ते मला माहित आहे. हा मुद्द्याचा प्रश्न आहे.

आसनाच्या सानिध्यात का हसला? कोणाला हसला? मग जे ज्ञान दिले, त्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या तऱ्हेने घेतला आहे का? ज्ञान, उपयोग व जपणूक ठेवली काय? पालन चांगल्या तऱ्हेने का नाही? कुठे हसला, कोणाला हसला व का हसला? याचा पूर्ण विचार करून शोधन करणे.

स्पष्टीकरण मी आसनाधीस्तांना विचारू शकतो किंवा आसनाधीस्त मला विचारू शकतात. सानिध्यात, कर्मसंचिता मध्ये ज्ञान जपणूक करता येत नाही.

सेवेकरी नाते श्रेष्ठ व पवित्र राखू शकले नाहीत. माझा नाईलाज आहे. सेवेकरी दिलेल्या ज्ञानात तल्लीन असतात काय? ज्ञान बहाल केलेले आहे. त्याचा उजाळा करू लागला तर वेळ प्रसंग येतील तेव्हा स्वतः सेवेकरी सत कृतिमान होऊन दूर हटवू शकेल. सेवेकरी हा शंकेत आहे कि शंकेच्या रहित आहे? म्हणजे अजून सद्गुरु व सत ओळखले असे म्हणावे की नाही? तुमच्या मायेसाठी, सुखदुःखांसाठी सत् आहे, पण भोगत्व कोणी भोगायचे? याच्यातून पार पडणे भाग आहे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page