श्री समर्थ मालिक – ज्ञान आत्तापर्यंत सर्वांना दिलेले आहे. आत्तापर्यंत कोणत्याही सेवेकऱ्यांना ज्ञान दिलेले नाही काय? ज्ञान आतापर्यंत मिळालेले नाही का? सेवेकऱ्यांना जे दिलेले आहे ते त्यांनी जतन करून ठेवलेले आहे कां? सर्व सेवेकऱ्यांना म्हणतो आहे. ते ज्ञान जतन करून त्याची जपणूक राखली आहे का? तर ते काही सांगता येत नाही असे म्हणावे काय?
मागच्या दरबारात एका सेवेकऱ्याने विषय दिला होता. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी ! सेवेकऱ्यांची मने जर शुद्ध स्फटिकासारखी असतील, तर आडमार्गी जाऊ शकतील काय? सेवेकरी संदेश डाऊलू शकेल? आदेश डावलू शकेल? मने शुद्ध नाहीत, मग ती काहीही करतील. मन शुद्ध नाही, मनाच्या प्रेमाची जोडी अशुद्ध. प्रेम सूत्राची दोरी सुद्धा मनाच्या अशुद्धतेने गढूळ करून असते. प्रेमाची दोरी शुद्ध नाही. मनात नाना तर्हेच्या शंका कुशंका क्षणोक्षणी आणू लागला तर मग अशानी ज्ञान घेतले काय?
सर्व सेवेकऱ्यांना स्पष्टीकरण दिलेले आहे. ज्ञान सर्वाना आहे पण सांभाळता येत नाही. त्या ज्ञानाची बूज राखली जात नाही. मग हे ज्ञान सांभाळायचे कोणी? या ज्ञानाची जपणूक कोणी करायची? याची व्यवस्था ठेवली तर त्याप्रमाणे मन शुद्ध होऊ शकते. दिलेल्या ज्ञानामध्ये तल्लीन सेवेकरी आहेत काय? निमग्न आहेत काय? काय पहात आहेत? सेवेकऱ्यांना माहित असेलच की काय काय दाखविले आहे व त्याप्रमाणे ते फिरले आहेत. त्या ज्ञानाची जोपासना कोणत्या तऱ्हेने व कशी करावयाची? जे कधी अनुभवले नाही ते पाहायला मिळत आहे व प्रत्यक्ष पहात आहात. (पुढे सुरु…२)©️
