Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

पुनर्रपी जननम्, पुनर्रपी मरणम् ©️

पुनर्रपी जननम्, पुनर्रपी मरणम् ©️

श्री समर्थ मालिक – दिसते ते नसते, अशी जर कल्पना असेल तर पुनर्रपी जन्माला कोण येते? पाच तत्वांचा हा देह आहे. मग नसते काय अन् अमर राहते काय? हा दृश्य अदृश्याचा खेळ आहे. प्रकृती अंग नटवले तरी, प्रकृतीला कोणत्यातरी निमित्ताने मी त्यागतो. पण कोणाच्या प्रेरणेने याची गती प्रकृतीला मिळत नाही. भक्ती मार्गाने ज्योत गेली तर त्याला ते समजेल. पण बोल गेला, कृती झाली मग पश्चातापयुक्त होतो. पण प्रथम काय?

अमर कोण आहे हे गुह्य आहे. नाशिवंत जडत्व आहे. ते कधी दृश्य होते तर कधी अदृश्य होते. त्यात चेतना आहे. त्यांचा (सताचा) त्यात वास आहे. कोणीही मरत नाही. कोणाचाही नाश होत नाही.

इतकेच की स्थूल देहाची जी अपेक्षा आहे ती दूर होणे कठीण आहे. पुनर्रपी जननम्, पुनर्रपी मरणम् असे म्हटले आहे. पुढे काय होते? मी कोणत्या जन्माला येतो? मागच्या जन्मी मानव होतो की कोण होतो असे काही सांगता येत नाही. पण जाणे येणे हा सिद्धांत आहे. मग नाश काय होते? ८४ लक्ष योनी फिरावे लागते ते कोणाला? अन् नाही कोणाला, इतके तरी माहित आहे ना? मग नाश कोणाचा होतो? म्हणून सेवेकर्‍यांनी अभ्यासू व्हावे. अभ्यासू होण्याचा प्रयत्न करावा. पूर्वजन्मीच्या संचितातून कधी मोकळे होता येईल याचा प्रयत्न करणे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page