Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

पटेल तोच झटेल…©️

पटेल तोच झटेल…©️

या दरबारात एक तरी सेवेकरी काम, क्रोधाची कुरवंडी केलेला, मायेचे मूळ उपटून टाकलेला आहे असे दिसत नाही. सेवेकऱ्याने आधी केले पाहिजे नंतर सांगितले पाहिजे. ते तुम्ही कृतीत आणा.

चआपल्या सेवेकऱ्यांजवळ अजूनही समतेचा पाझर फुटलेला आहे असे दिसत नाही. अजूनही हेवे दावे गेलेले नाहीत. अजूनही एकमेकांची थट्टा मस्करी करणे गेलेली नाही. मला सांगा, आपणात एकमेकांविषयी प्रेमळपणा किती आहे? सद्गुरुं बरोबरचे प्रेमळपणाचे नाते किती आहे? हे जर अखंड नाते आहे, तर आपण कसे राहिले पाहिजे? पहा, विचार करा ! आपणाला मी जे सांगतो आहे हे लक्षात ठेवून तसे तरी करा. मनाला येईल तसे करू नका. आसनाधिस्तांचे संदेश असतील तसे करा. येथे सर्वांना सारखे अधिकार आहेत. हे मी मोघम बोलत आहे.

समर्थांची इच्छा असतेच की आपला सेवेकरी अशा पात्रतेचा केव्हा होईल? तेव्हा, ज्याला पटेल तोच या ठिकाणी झटेल. ज्याला न पटेल तो आपोआप फाटेल.

कृष्णावतारात अर्जुनाचे काहीतरी संचित असले पाहिजे. त्याचप्रमाणे दुर्योधनाचे असले पाहिजे. दोघेही माझ्या सानिध्यात होते. मग अर्जुनालाच पाठीशी का घातले? त्याच्याकडून कर्तव्य करून घ्यावयाचे होते. भीष्मही त्या तऱ्हेची ज्योत होती. त्याच्याच कृतीप्रमाणे त्याला फळ दिले. दुर्योधनाला त्याच्या कृतीप्रमाणे फळ दिले. या ठिकाणी, या स्थानात प्रेम, समता, बंधुभाव असा त्रिवेणी संगम सेवेकऱ्यांच्या हृदयात असावयास पाहिजे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page