Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

धनसंपदा मिळाली म्हणजे मोक्ष आहे का? ©️

धनसंपदा मिळाली म्हणजे मोक्ष आहे का? ©️

धनसंपदा मिळाली म्हणजे मोक्ष आहे का? मग कृतीमान कधी होणार? मी शेषावर पहुडलो आहे. शेषावर पहुडलेले तत्त्व जर झोपलेले असते, तर मग मी अह:र्निश झोपलेलो असतो, नाही का? तर नाही. मला नाही झोप, नाही जागरण ! रात्र नाही, दिवस नाही ! आकार नाही, विकार नाही ! मग मला कसे ओळखाल?

सेवेकरी आपल्या कर्तव्यात जागृत राहिला, तर तो सुखदुःखाची व्याख्या करील असे मला वाटत नाही. “जे प्रणव टाकले, ते कोणाच्या सत्तेने टाकले जातात?” त्याला भंग आहे का? तर नाही. म्हणून त्याला अभंग म्हटले आहे. किती वर्षापासून हे चालत आलेले आहे? ते खोडून काढण्याचे कोणाचे सामर्थ्य आहे का?

ज्या संताने म्हटलेले आहे, “कानी न पडती बोल माझे” | मग बोल कानी पडत नाहीत का? हे लक्षात घ्या.

पूर्व जन्मानुसार सानिध्यात घेतले आहे‌, ते दुर्लक्ष करण्यासाठी सानिध्यात घेतलेले नाही. आपणच शांती मिळवू शकता. सानिध्यातील ज्योतीना शांती देऊ शकता, पण शंका रहित झाले पाहिजे. दररोज गाऱ्हाणी सांगितली, तर भक्तीचे सार्थक होते का? म्हणून सेवेकऱ्यांनो, कोणीही सुखदुःखाच्या वेगळा नाही. ते सुटलेले नाही. फक्त जो अखंड तत्वात रममाण झाला, त्याला सुखही नाही, दुःखही नाही. अशा तऱ्हेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करा. काहीही त्रास झाला तरी कर्तव्य सोडू नका. (समाप्त)©️

You cannot copy content of this page