Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

…तर ज्याचा तोच! ©️

…तर ज्याचा तोच! ©️

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. कहर झाला तरी ते सतोपदेश करीत होते. ज्यांनी ग्रहण केला त्यांना ठेवले बाकीच्यांचा नाश झाला.

गुरुदेव पितामह सत युगापासून कर्तव्य हाकीत आहे. कर्तव्य म्हणजे संयमनाचे कर्तव्य ! अघोरांना देखील सतोपदेश करीत होते. तो त्यांनी ग्रहण न केल्यामुळे कोणती स्थिती झाली?

गुरुदेव म्हणतात, “जे प्रणव सद्गुरु माऊली देत आहे ते मी ही देत होतो. त्यामुळे मला पूर्णत्व कल्पना आली आहे. एका ज्योतीमुळे अनेक ज्योती संरक्षण घेऊ शकतात. एक ज्योत सात्विक व अनेक ज्योती अघोर असतात. त्या अनेक ज्योतींच्या स्थितीमुळे कलियुगी स्थिती निर्माण झाली आहे. मग जे अनंताने प्रणव दिले ते पूर्णत्व आहेत.”

गुरुदेव पितामह पदोपदी दृश्याला प्रणव देत असत. त्या मानवाने इतरांना प्रणव दिलेच पाहिजेत. ते जर ग्रहण केले नाहीत तर ज्याचा तोच!

सद्गुरु बाबा म्हणतात, “वीस वर्षे शुद्धीकरण घेतले ते वेगळे. ते अदृश्य. दृश्य शुद्धीकरण वेगळे आहे. दृश्य शुद्धीकरणा शिवाय ही कलियुगी स्थिती नष्ट होणार नाही. जो सतमय स्थितीने कर्तव्य करीत आहे त्यावर सताचे पूर्णत्व लक्ष आहे. जर सतमय स्थिती नसेल तर कोणती स्थिती करणार? मी फक्त आदेश देणार! अन त्रिगुण कर्तव्य करणार! स्थिती स्तब्ध करणे ही आपणाजवळ गती आहे. पूर्णत्व मानवांनी कल्पना घेतली पाहिजे. मी सत कर्तव्यात राहीन, तर सत माझे अवश्य संरक्षण करील.” ©️

You cannot copy content of this page