Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

तत्त्व भिन्न का प्रकृती भिन्न २ ©️

तत्त्व भिन्न का प्रकृती भिन्न २ ©️

अनेक वेळेला प्रवचने झालीत. गुरुबंधूत्वाचे नाते फार श्रेष्ठ आहे. याचे वर्णन कोणालाही करता येत नाही. परलोकी सुद्धा याची ओळख होऊ शकते, पण हे सेवेकऱ्यांना घेता येत नाही.

गुरुबंधूत्वाच्या नात्याची कितीही चिकित्सा करा, किती फरक पडतो याचा सेवेकर्‍यांनी विचार करा. हे नाते असताना एकमेकांना संशयी वृत्तीने, गटबाजीने पाहता म्हणजेच द्वैत भावनेने पाहणे होय. त्या ठिकाणी नाते शोधले जात नाही म्हणून हे उत्पन्न होत असते. मी कोणीतरी आहे अशी भावना निर्माण होते. मग अहंकार, हेवेदावे, अहंपणा निर्माण होतो. ही भावना जोपर्यंत मरत नाही, म्हणजे गटबाजी, कुचेष्टा अन् थोडीशी का होईना अधिकार वाणीने बोलण्याची सवयही असते, म्हणून तत्त्व भिन्न कि प्रकृती भिन्न? ही विचारणा केली.

प्रकृती भिन्न आहे म्हणून हा गोंधळ होत आहे वाढत आहे, मग सेवेकर्‍यांनी तत्त्वाप्रमाणे चालले पाहिजे की प्रकृतीच्या गतीप्रमाणे चालले पाहिजे? (पुढे सुरू…©️)

You cannot copy content of this page