Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

ज्ञानाची मूर्ती (३) ©️

ज्ञानाची मूर्ती (३) ©️

आपल्या दरबारात मायावी ज्योती येतात. आपण म्हणतो की, कर्मसंचित दूर ढकला. तसे नाही. एवढ्या योनीत ढकलले तर, ते आणि हे असे द्वय कर्मसंचित भोगावे लागते. आपले सेवेकरी आजारी असतात. ते कर्मसंचित पुढे ढकलता येणार नाही. पुढे ढकलले तर द्वय संचित भोगावे लागेल. यापेक्षा जे आहे ते तू भोग. जर दूर करावयाचे असेल, तर अखंड नामात दंग हो ! धुतल्या तांदळा सारखा शुद्ध रहा. नामामुळे शुद्ध होशील. मी–तू पणा, अहंपणा सर्वस्व विसरशील ! नंतर मालकांची जाणीव मिळेल. शेवटी त्यांच्यात लय होशील. आपले सेवेकरी अंती विव्हळता कामा नये. 

प्रत्यक्ष अखंड नाम, माझे सद्गुरु यांच्यात लय झालात, तर किती चांगले होईल. ‌प्रत्येकाने ओळख ठेवा. सत् मार्गाने चला. कष्ट करावयाचे अगोदर फळाची इच्छा केल्यास ते फळ दूर जाते. मी कष्ट करीन, फळाची इच्छा करणार नाही. अशा तऱ्हेने ज्योत जाईल, तर काय होईल?

अखंड नामात सद्गुरु आहेत. ते नामस्मरण मनापासून न केले तर भीती वाटते. ही ज्ञानाची मूर्ती कशी आहे, याची पाहणी करा. चांगल्या रितीने वागा. याचेपुढे तरी निदान आसनाधिस्तां बरोबर बनवा बनवी करु नका. त्यांना सर्व माहित असते. ते चार माणसांत उघड करणार नाहीत. झालेली चुक कबुल करणे. (३)©️

(समाप्त)

You cannot copy content of this page