Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

कोणी सद्गुरूंचा अंत लावला आहे का?©️

कोणी सद्गुरूंचा अंत लावला आहे का?©️

श्री संत नामदेव महाराज – दुसरी गोष्ट, रुधीराचे दुधात मंथन करून शुभ्र केले आहे. कोणाला दुधाची, तर कोणाला ताकाची चव असते. ताक हे सर्वस्व शुभ्र आहे. दुधाला विरजण घातले की दही होते. त्याला आंबट वास येतो. त्याचे घुसळण केले की ताक बनते अन् लोणी वर येते. ते पण शुभ्रच असते.

आता या तिन्ही वस्तूंचा कधी सुगंध सुटला आहे का? तद्नंतर तेच लोणी एखाद्या भांड्यात घालून अग्निवर ठेवले की मग सुगंध सुटतो. तो कुणी पकडला आहे का? असे जे सत आहे, ते सुगंध युक्त आहे. ते कोणाला सापडले आहे का? जे त्या ठिकाणी लयबद्ध झाले ते परत आले नाहीत. म्हणून सद्गुरु हे सर्वस्वाचे निधान आहे. ते वाटेल त्या तऱ्हेने कस घेतील. पण सेवेकऱ्याला वाया घालविणार नाहीत.

अत्यंत दयाघन असे ते तत्व आहे. त्यांच्या लिलेचा अंत नाही. ज्यांना ते सापडत नसेल, त्याने सुगंधात तरी निमग्न होण्याचा प्रयत्न करणे ही विनंती आहे.क्षणात निराकारी बनतील, क्षणात आकार धारण करतील. सदोदित स्थानवंत असे हे तत्व आहे. असे असून सुद्धा, निर्गुण निराकार पदानेही व्यवहार करतात. माझ्यासारख्या सेवेकऱ्याने आणखी किती वर्णन करावे? म्हणून येथील सेवेकरी महान भाग्यवान आहेत.

कोणी सद्गुरूंचा अंत लावला आहे का? कोणी म्हणतो आम्हाला दर्शन नाही, कोणी म्हणतो प्रकाश नाही. येथील सर्वस्व सेवेकर्‍यांना दर्शन मिळालेले आहे. सत् हे अगाध लीलाधारी आहेत. ते कुठेही दर्शन देतील, पण हे सेवेकर्‍यांनी ओळखले पाहिजे. जशी प्रकृतीची पात्रता, त्याप्रमाणे घडण घडत असते. (पुढे सुरू…३) ©️

You cannot copy content of this page