Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

कुकर्माचा घडा…©️

कुकर्माचा घडा…©️

श्री समर्थ मालिक – या पृथ्वीच्या पृष्ठभागावर ३/४ असत व १/४ सत् आहे. या असताचा पगडा जोराने बसतो म्हणजे सत त्या ठिकाणी लवचिक होते. लवचिक होऊन सुद्धा त्याच्यावर दडपण टाकण्याचा प्रयत्न होतो. असे का होते? याचे कारण एकच, क्रोधाने, मी पणाने, प्रकृतीने गडबडलेल्या ज्योतीना सात्विकता कशी निर्माण होणार? ती ज्योतच वाईट विचारांची आहे. सर्वस्व आसनाचा कारभार त्याच्या हाती पाहिजे होता, पण ते न झाल्यामुळे त्याच्या मनाची अदलाबदल झाली.

हे मानव का सतावतात त्याचे कारण एकच. असत कर्तव्याचा, कुकर्माचा घडा भरून घ्यावयाचा आहे. ते मला करून घ्यावयाचे आहे. घडा पूर्णत्व भरल्यानंतर थोड्या दिवसांनी याची स्थिती काय होईल ते आपणास दिसून येईल. दमाने, धीराने कर्तव्य उज्वल होत असते. आतताईपणाने ते बरोबर होणार नाही. हे कूकर्माचे घडे भरल्यानंतर ते कर्तव्य कायमचे राहते. पुढे त्याच्या कृतीचा प्रकाश चमकू लागला म्हणजे त्याला कुठे टाकायचे ते आपोआप घडते. ती कृती झाल्यानंतर मग सत् भक्तांना त्रास नसतो.

वेळ काळ नजीक आला आहे. पण अशा अघोर मानवाने कितीही प्रयत्न केला तरी काही होणार नाही. या धूर्त लोकांनी ते प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवात केली होती. थोड्याच दिवसात याचा निर्णय लागेल. कायद्याच्या दृष्टीने जरी निर्णय लागला नाही, तरी अखेर याचा निर्णय मीच लावणार आहे. तो कोणता निर्णय लागेल ते आत्ताच मी सांगू शकत नाही. सत् भक्ताला जितका त्रास दिला, त्याच्या दुपटी तिपटीने त्यांना प्रायचित्त भोगायला लावीन. ते अनुभवण्यास मिळेल. ©️

You cannot copy content of this page